एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पालघरमध्ये घोळ माशाच्या बोथाला 550000 रुपयांचा विक्रमी भाव
या मासळीपेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातो. वाम, कोत, शिंगाळा या मच्छीच्या बोथालाही चांगली मागणी आहे.
![पालघरमध्ये घोळ माशाच्या बोथाला 550000 रुपयांचा विक्रमी भाव Ghol fish Lung bag sold at rupees 550000 lakh in Palghar पालघरमध्ये घोळ माशाच्या बोथाला 550000 रुपयांचा विक्रमी भाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/06090244/both-fish.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : मुरबे येथील एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाच्या 720 ग्रॅमच्या बोथाला (फुप्फुसांची पिशवी) व्यापाऱ्याने पाच लाख 50 हजारांचा भाव दिला दिला. आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जात आहे.
जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सातपाटी, मुरबे, डहाणू, केळवे या बंदरांत घोळ, दाढ मासे पकडण्यासाठी वागरा पद्धतीच्या जाळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मासळीपेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातो.
वाम, कोत, शिंगाळा या मच्छीच्या बोथालाही चांगली मागणी आहे.
घोळ मच्छीच्या मांसाला 800 ते एक हजार रुपये प्रति किलो दर मिळत असला, तरी नर जातीच्या बोथाला सर्वाधिक मागणी आहे. मादी जातीच्या बोथाला पाच चे दहा हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. त्याचा वापर निसर्ग सौंदर्य प्रसाधनात, शस्त्रक्रियेचे टाके घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धाग्याच्या निर्मितीसाठी आणि औषधे बनविण्याकरिता केला जातो.
उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यांकडून हे बोथ खरेदी केले जातात.
![पालघरमध्ये घोळ माशाच्या बोथाला 550000 रुपयांचा विक्रमी भाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/06090256/both-fish-1.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion