सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे निवृत्त, मराठा आरक्षणाच्या चळवळीत भांगेंची भूमिका महत्वाची
सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumant Bhange) आणि अप्पर मुख्यसचिव सेवाचे सचिव नितीन गदरे (Nitin Gadare) हे आज निवृत्त होतं आहेत. मराठा आरक्षणाच्या चळवळीत भांगेंची भूमिका ही महत्वाची आहे.
मुंबई : सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumant Bhange) आणि अप्पर मुख्यसचिव सेवाचे सचिव नितीन गदरे (Nitin Gadare) हे आज निवृत्त होतं आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) एकूणच चळवळीत भांगेंची भूमिका ही महत्वाची आणि निर्णायक होती. सामाजिक न्याय विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाचे ते सचिव होते. सामान्य प्रशासन विभागाकडून आजवर मराठा आरक्षण व मराठा कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत निघालेले बहुतेक सर्वच शासननिर्णय हे सचिव भांगे यांच्या स्वाक्षरीनेच निर्गमित झाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विविध पातळ्यांवर शासनाच्यावतीने समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी व भूमिका भांगे यांनी निभावली आहे.
सुमंत भांगे यांना राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांची जाण व तळमळ असल्यानेच त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच मराठा आरक्षणाचा विषय सोपवण्यात आला होता. सुमंत भांगे आज निवृत्त होत असले तरी मराठा समाजाबाबत त्यांच्याकडे सोपवलेलं काम हे तेच पाहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बैठकित याबाबतची घोषणा केल्याची सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: