Gautami Patil Exclusive on Majha Katta : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाटलं सगळं संपलं, आता थांबावं, 'त्या' व्हिडीओवर गौतमी पाटील भावूक
Gautami Patil Exclusive on Majha Katta : माझ्यामागे कुणीही नाही, माझ्यासोबत कुणाचाही हात नाही म्हणून माझ्यावर टीका केली जाते असं सांगताना गौतमी पाटील भावुक झाली.
मुंबई : लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलने (Gautami Patil Majha Katta exclusive) एबीपी माझाच्या माझा कट्टा (ABP Majha Katta) या कार्यक्रमात एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी तिने तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत भाष्य केलं. जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याबाबत गौतमी पाटील म्हणाली, "कार्यक्रमाच्या बॅकस्टेजच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं आता सगळं संपलं. आता थांबावं, लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून मग ते या पातळीपर्यंत जातात याचा धक्का बसला. पण नंतर प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर मी पुन्हा उभी राहिली, महिला वर्गानेही सपोर्ट केला. त्या सर्वांचे आभार मानते". एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात गौतमी पाटीलने विविध विषयांवर भाष्य केलं.
Gautami Patil reaction on her Viral Video : व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया
एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्याबाबत गौतमी पाटीलने एबीपी माझा कट्टावर प्रतिक्रिया दिली. गौतमी पाटील म्हणाली, "माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता थांबावं. मला अक्षरशः धक्का बसला होता. त्यावेळी मी घरी होते. मी प्रचंड घाबरले होते. त्यावेळी मी एकच विचार केला, आता सगळं संपलं आहे, आता थांबायचं. लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून लोक इथपर्यंत जातात का? पण मी थांबले तर त्यांच्या मनासारखं होणार, म्हणून मी नव्याने सुरूवात केली. समोरून मला रिस्पॉन्स कसा येईल, लोक काय बोलतील याची भीती वाटत होती. पण लोकांचे आभार, त्यांनी मला सांभाळून घेतलं. प्रेक्षकांनी साथ दिली नसती तर उभी राहू शकली नसते, महिला वर्गानेही सपोर्ट केला".
Gautami Patil Exclusive on ABP Majha Katta : मी गरीब घराण्यातील म्हणून माझ्यावर टीका?
डान्सच्या कार्यक्रमावर होणाऱ्या टीकेवर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, कधी कधी वाटतं की मी गरीब घराण्यातील आहे, म्हणून माझ्यावर टीका केली जाते. मला कुणाचा पाठिंबा नाही, माझ्यासोबत कुणाचा हात नाही. सोबत म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागतं असं वाटतं. ज्यावेळी माझ्याकडून चूक झाली त्यावेळी मी माफी मागितली, आता व्यवस्थित करते तरीही हे असं होतंय. माझ्यासारखे अनेक कलाकार सिनेमापर्यंत गेले आहेत. पण त्यांच्यावर कुठेही बोललं जात नाही. आपण पुढे चाललो म्हणून टीका, त्यामुळे कधीतरी वाटतं की, माझं कुणीच नाही, माझ्या मागे कुणीच नाही.
ज्यावेळी माझ्यावर कुणी टीका केली त्यावेळी मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. टीका करणारे लोक मोठे आहेत, मला राजकारण समजत नाही. मला आयोजक ज्या गाण्यावर डान्स करायला सांगतात त्यावर मी करते असं गौतमी पाटील म्हणाली.
Gautami Patil On Marriage : मला स्वीकारणारा मुलगा हवा
गौतमी पाटील लग्न कधी करणार असं तिला विचारण्यात आलं. त्यावर गौतमी म्हणाली की, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. पण मग माझ्याशी लग्न करणाऱ्या मुलाने माझ्यासोबत जे काही झालंय ते स्वीकारावं ही अपेक्षा आहे. मला अनेकांकडून लग्नासाठी मागणी घातली जातेय. एक मुलगा तर कार्यक्रमाच्या ठिकाणीच आला होता. माझ्या मॅनेजरशी बोलला, लग्नासाठी मागणी घालण्यासाठी आल्याचं त्याने सांगितलं.
Gautami Patil Majha Katta Exclusive VIDEO : गौतमी पाटीलसोबत एबीपी माझा कट्टावर संवाद
ही बातमी वाचा:
- Gautami Patil : आक्षेपार्ह व्हिडीओवर काय म्हणाली गौतमी पाटील? एका कार्यक्रमासाठी किती लाखांची सुपारी घेते? वाचा काय म्हणाली गौतमी पाटील
- Gautami Patil : आईचा अपघात झाला, मंगळसूत्र गहाण ठेवलं, मग जगण्यासाठी डान्सच्या क्षेत्रात आले; गौतमी पाटीलने उलगडला आतापर्यंतचा प्रवास