एक्स्प्लोर

हिंदू-मुस्लीम एकतेचं प्रतिक असलेल्या ताजुद्दीन शेख महाराज यांच्या पार्थिवावर जालन्यातील बोधलापुरी गावात अंत्यसंस्कार

Dhule : कीर्तनकार ताजुद्दीन शेख महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) हे क्रांतीकारी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. धुळ्यातील जामदा गावात कीर्तन सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

धुळे/औरंगाबाद : विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने आपले संपूर्ण आयुष्य जगणारे वारकरी संप्रदायातील मात्र धर्माने मुस्लिम असलेले ताजुद्दीन शेख औरंगाबाद यांचे काल (सोमवारी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जामदा येथे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी जालना जिल्ह्याच्या घनसांगवी तालुक्यातील बोधलापुरी गावातील त्यांच्या आश्रमात साई मंदिराच्या समोर त्यांचा दफनविधी करण्यात आला.

कोण होते ताजुद्दीन महाराज? 
वारकरी सांप्रदाय हा वेदप्रणीत आहे. गीता कुराण या हिंदू आणि मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथांमधून एकम सत्य अर्थात ईश्वरी तत्त्व एकच असल्याचा संदेश देण्यात आल्याचे अभ्यासाअंती पटल्यानंतर ताजुद्दीन नूर महंमद उर्फ सच्चिदानंदगिरी महाराजांना मानवता हाच खरा धर्म आणि सर्व जातीधमांना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय जवळचा वाटला. त्यातूनच त्यांनी आपला भाव पांडुरंगी दृढ करून कीर्तनसेवेतून प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले होते. राज्यासह देशाच्या विविध प्रोतांमधून ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झाले होत.

Dhule : कीर्तन सुरु असतानाच कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाथ षष्ठीला पैठणची आणि आषाढीला पंढरपूरची वारी हा महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग  असं ते नेहमी सांगत . पांडुरंगाच्या ओढीनेच महाराजांचा संत वचनांसह गीता कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही पहायला मिळाययचे. हिंदू- मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज नेहमी सांगत. मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा अवगत झाल्यानंतर गीतेतील श्लोक आणि कुराणांमधील हदीस, आयते यांचा अर्थबोध होईल आणि एकमेकांविषयी तयार झालेली द्वेषाची जळमटे गळून पडतील, असा विश्वास महाराजांना वाटायचा.

जन्माने मुस्लीम असले तरी वारकरी प्रदायाची जीवनशैली अंगीकारलेले ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन कीर्तन आणि वारीलाही जाण्याच्या परंपरेचेकसोशीने पालन करत . मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी हे त्यांचे गाव .गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार प्रचाराचे काम केले जाते. सर्वच संतांच्या अभंग गांचा त्यांचा अभ्यास आहे. महाराज लहानपणापासूनच सांगत, वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले. हरिपाठ म्हणणे, भजन-कीर्तन ऐकणे यात मनाचा ओडा पाहून कुटुंबीयांचा विरोध पत्करून एके दिवशी आलंदी गाठली. तेथून हृषीकेशला पोहोचलो, त्र्यंबकेशरला गेले. तेथे अनुग्रहित होऊन वारकरी सांप्रदायाच्या अभ्यासासाठी ज्ञान ग्रहण केले. मूळचा मुस्लीम असल्याने कुराणाचाही अभ्यास केला. गीतेचाही अभ्यास घडल्याने देन्ही धर्मातील पवित्र ग्रंथात मानवतेच्या कल्याणाचे संदेश असल्याचे आपल्या कीर्तनातून सांगत.

कुराणातील पहिल्या अध्यायातील सुरुवातीलाच आलिफ लाम मीम

मिम जालिकल किताबों ला रहे बहुदलिल मुत्तकिना लजीन, असे नमूद केले आहे.

तर गीतेमध्ये सर्व धर्मान् परित्याज्य मामेकम शरणम वज्यं, असे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात. या दोन्हींचा अर्थ मी एक आहे. मला कोणीही नाही. मोच सर्व समांमध्ये नटलेलो आहे. मला अनंत नावे आहेत पण मी एक तत्त्व आहे. तू मला शरण ये फक्त तुझे मन माझ्याकडे लाव, असा संदेश दोन्ही धमांतून दिला गेला आहे.

संतांनीही कोणत्याही जिवाचा न घडो सत्सर, असाच मार्ग दाखवला आहे. मात्र, आजही अनेक जण एकमेकांचा द्वेष करण्यासाठी सरसावतात. एका धर्मातील व्यक्ती दुसऱ्या धर्माची महती सांगत असल्यामुळे आपल्याला आजही त्रास होतो  अशी भावना ते अनेक वेळा बोलवून दाखवत, कोणाचेही पाठबळ मिळत नसल्याची त्यांच्या मनात सल होती . सुख-दुःखाविषयी जाणून घेत नाहीत, अशी ताजुद्दीन महाराज व्यक्त करताना मानवातील कुप्रवृत्ती सर्वत्र असल्याचे अधोरेखित करतात. असा एक दोन धर्मातील दुवा आज हरवून नेला आहे. त्यांना कीर्तन चालू असतानाच देवाज्ञा झाली हे विशेष.

ताजोद्दीन महाराजांनी आजवर हजारो कीर्तनं केली. दोन वर्षांपूर्वी आपल्याला कीर्तन करतानाच मृत्यू यावा असं एका कीर्तनादरम्यान त्यांनी म्हटलं होतं. आणि आज कीर्तनादरम्यानच त्यांनी आपला देह ठेवला. ताजोद्दीन महाराजांच्या जाण्यानं एक कीर्तनकारच नव्हे तर दोन धर्मांमधला एक दुवाही निखळला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget