एक्स्प्लोर

सांगली शहरात नववर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीने; दोघांना अटक 

गाड्यांच्या कांचांवर मोठमोठे दगड फेकून तोडफोड करण्यात आली आहे. सुमारे 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे.

सांगली : सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरात नवीन वर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीनं झाली. चारचाकी वाहने पेटवून, तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार या परिसरात घडला आहे. दोन चारचाकी वाहने पेटवून सुमारे 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील 100 फुटी रोडवर घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची जाळपोळ करत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 4 ते 5 जणांच्या टोळक्याने 100 फुटी रोडवर असणाऱ्या गाड्यांवर अचानक हल्ला चढवला. या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहेत. याठिकाणी उभी असलेली एक स्कॉर्पिओ आणि एक मारुती कार अज्ञातांनी पेटवून दिली. दोन्ही वाहने जाळून खाक झाले आहेत. तर या रोडवर असणाऱ्या इतर चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

गाड्यांच्या कांचांवर मोठमोठे दगड फेकून तोडफोड करण्यात आली आहे. सुमारे 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी या मार्गावरुन जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्या व अन्य एका कुटुंबांच्या गाडीवरही दगडफेक केली. यानंतर कोरी यांनी या रस्त्यावर असणाऱ्या एका पोलीस मदत केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन पथकालाही पाचारण केलं. त्यानंतर पेट घेतलेल्या गाड्यांची आग विझवण्यात आली.

पोलिसांनी तातडीने याठिकाणी असणाऱ्या काही सीसीटीव्हींची पाहणी केली. चार जण गाड्यांची तोडफोड करत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर दोघांना ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात दारुच्या नशेत हे कृत केल्याचं पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget