एक्स्प्लोर
Advertisement
16 डिसेंबर पासून मुंबई विमानतळाहून थेट पुणे, दापोलीसाठी एस.टी.ची बससेवा
शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली - स्वारगेट च्या 17 फेऱ्या व शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली - दापोलीच्या तीन फेऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी संताक्रूज डोमेस्टिक विमानतळ येथून सुरु होत आहेत.
मुंबई : मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळामार्फत शिवनेरी (वातानुकूलित) व शिवशाही (वातानुकूलित) बससेवा 16 डिसेंबर 2019 पासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-1 येथून पुणे व दापोलीसाठी सुरु करण्यात येणार आहे.
शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली - स्वारगेट च्या 17 फेऱ्या व शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली - दापोलीच्या तीन फेऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी संताक्रूज डोमेस्टिक विमानतळ येथून सुरु होत आहेत.
प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-1 येथे गाड्यांचे वेळापत्रकांचा फलक लावण्यात आला आहे. एसटी महामंडळाचा अधिकृत लोगो असलेला फलक व एसटी महामंडळाची वेबसाईट व टोल फ्री क्रमांक असलेला फलक लावण्यात आला आहे. इतकाच नाहीतर ज्या ठिकाणी एसटी बस चढ-उतारासाठी थांबणार आहेत त्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवाशी थांब्याचा फलक लावण्यात आला आहे.
प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी 2 सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली असून तिकीट बुकिंग msrtc.maharashtra.gov.in करता येणार आहे, अशी माहिती एसटी महमंडळाकडून देण्यात आली आहे
काय आहे वेळापत्रक
शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली - स्वारगेट , सांताक्रूझ टर्मिनस-१ (domestic) येथून सुटण्याच्या वेळा , 5.30, 6.30, 7.30, 8.30, 9.45, 10.45, 11.45, 12.45, 13.45, 14.45, 15.45,16.45,17.45,18.45, 19.45, 20.45, 21.45
शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली - दापोली, सांताक्रूझ टर्मिनस-1 (domestic) येथून सुटण्याच्या वेळा 7.30, 21.45, 23.30,
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement