विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा पास
शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत
मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास (ST Bus Pass) हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार एसटी महामंडळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम
या संदर्भात 18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे " एसटी पास थेट तुमच्या शाळेत " ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.
15 जूनपासून 'एक राज्य एक गणवेश'
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो.
'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' विशेष मोहीम
विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचा वितरण केले जात आणि त्यासाठी आता पाच केंद्रावर जाऊन किंवा आगारात जाऊन पास घेण्यासाठी रांगत उभे राहण्याची गरज नाही एसटी बसचे पासेस आता थेट शाळेत दिले जाणार आहेत.
हे ही वाचा :
Maharashtra School: व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटकींची उसळ ते तांदळाची खिचडी...; 15 पदार्थांचा राज्याच्या शालेय पोषण आहारात समावेश