एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणाचा 8 दिवसांत छडा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणाचा 8 दिवसानंतर छडा लागला आहे. याप्रकरणी चार आरोपींना सांगली पोलिसांनी अटक केलीय.
सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणाचा 8 दिवसानंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक केलीय. सुपारी देऊन खटावचे राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
खटावचे राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यासाठी 40 लाखांची सुपारी देण्यात आली होती, असे समोर आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अखेर आठव्या दिवशी आनंदराव पाटील यांच्या हल्लेखोरांना पकडले आहे. वैयक्तिक करणातून ही हत्या झाली असून अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी पुण्याच्या अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या दोघांना आनंदराव पाटील यांच्या हत्येसाठी 40 लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सुरुवातीला राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आरोपी सापडल्यानंतर हा खून गावातील वैयक्तिक वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.
सांगली महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदावर पुन्हा भाजपचंच वर्चस्व
कोण आहेत मनोहर पाटील -
मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते.
आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आनंदराव पाटलांची हत्या
आठ दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी या हत्येचा आठ दिवसात तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Sangli Murder | सांगलीत राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement