एक्स्प्लोर
अमरावतीत पोलिस व्हॅनखाली चिरडून चार चिमुकले जखमी
शारदा उत्सवातील ड्युटी संपवून पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅननी रस्ता ओलांडणाऱ्या मुलांना चिरडलं.
अमरावती : पोलिसांच्या भरधाव गाडीखाली चिरडून चार चिमुकले जखमी झाले आहेत. अमरावतीतल्या मंगरुळ चव्हाळा गावात काल रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
शारदादेवीच्या प्रतिष्ठापनेनंतर चिमुकले घराकडे जात होते. शारदा उत्सवातील ड्युटी संपवून पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅननी रस्ता ओलांडणाऱ्या मुलांना चिरडलं. अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस व्हॅनची तोडफोड केली आणि चालकाला पकडलं, मात्र इतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हा अपघात घडला असून ही गाडी मंगरुळ चव्हाळा पोलिसांची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement