एक्स्प्लोर

NSE Scam Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणीत वाढ, सीबीआयला मिळाले महत्त्वाचे पुरावे

NSE Scam Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Sanjay Pandey) यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Sanjay Pandey) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचे समोर आले असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. 

शुक्रवारी जोगेश्वरी कार्यालयात केलेल्या झाडाझडतीदरम्यान सीबीआयच्या पथकाने असे एक उपकरण जप्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने चार रेड सर्व्हरचा वापर केला आहे. प्रत्येकी एक एनएसई कर्मचाऱ्यांना सेवा देणार्‍या चार एमटीएनएल टेलिफोन लाईनशी संलग्न आहे. यातील प्रत्येक उपकरणात एकावेळी 120 कॉल टॅप करण्याची क्षमता आहे. 

कंपनी आपल्या जोगेश्वरी कार्यालयात टॅप केलेल्या टेलिफोनिक संभाषणाचे उतारे तयार करत असे आणि NSE च्या  वरिष्ठांना पुरवत असे. सीबीआयच्या पथकाने कार्यालयातून असाच एक उतारा जप्त केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सीबीआयच्या पथकाने जोगेश्वरी येथील कार्यालयातून  25 डेस्कटॉप, दोन लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित अनेक दस्तऐवजही जप्त केले होते.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांच्या कंपनीने मुंबईतील एनएसई इमारतीच्या तळघरातून कथित बेकायदेशीर कृत्य केले. या कंपनीला येथे एक छोटी जागा देण्यात आली होती.

2009 ते 2017 दरम्यान बॉंम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.   चित्रा रामकृष्ण या NSE च्या माजी एमडी आहेत, तर रवी नारायण हे NSE चे मीजी सीईओ आहेत. 

महत्वाच्या बातम्या

NSE Scam And Sanjay Pandey : एनएसई घोटाळा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे का अडकले? जाणून घ्या 

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, तीन गुन्हे दाखल, नऊ ठिकाणी छापे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget