एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या माध्यमातून उपेक्षीतांना मुख्य प्रवाहात आणणार, माजी आमदार राजीव आवळेंचं प्रतिपादन

कोल्हापूर जिल्ह्यातील मोठं राजकीय प्रस्थ असलेल्या राजीव आवळेंनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून उपेक्षीत समाजाला न्याय देण्याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं

मुंबई: एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षात राजकीय इनकमिंग सूरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवार (16 डिसेंबर) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

राजीव आवळेंचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे नगरसेवक अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

राजीव आवळेंच्या पक्ष प्रवेशाने हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबुत होणार आहे. तालुक्यात त्यांचा प्रचंड जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. या आधी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाला कोणताही नेता नसल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं असूनही पक्ष नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. ती आता राजीव आवळेंच्या प्रवेशाने भरुन निघाली आहे. तसेच इचलकरंजी नगरपालिकेत त्यांचा वेगळा गट आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेमध्येही राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम राजीव आवळे यांच्यासोबत पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण आगीतून फुफाट्यात आलो असा विचार कधीच करु नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच राजीव आवळेंना विकास कामात आपण लागेल ती मदत करु असंही आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापूरातील राष्ट्रवादी पक्ष भक्कम होत असताना राजीव आवळेंसारखा दांडगा जनसंपर्क असलेला नेता पक्षात येतोय याचा आनंद होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "राजीव आवळे यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे. जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करु."

कोण आहेत राजीव आवळे? इचलकरंजी नगरपालिकेचे सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून राजीव आवळेंची ओळख आहे. त्यांनी 2004 साली तत्कालीन वडगाव विधानसभेची निवडणूक लढवली आणि माजी मंत्री जयवंत आवळेंचा पराभव केला. आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी हातकणंगले तालुक्यात प्रचंड जनसंपर्क वाढवला. 2009 सालच्या मिरज दंगलीनं कोल्हापूरचं राजकारण बदललं. त्याचा फटका जिल्ह्यातील भल्या-भल्यांना बसला. राजीव आवळेंचा त्यात समावेश होता.

राजीव आवळे यांच्या पत्नी सौ. स्मिता आवळे या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्याही राजकारणात सक्रिय आहेत. आवळेंचे बंधू अब्राहम आवळे हे इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक आहेत. राजीव आवळे यांचं 'बहुजन रयत परिषदे' च्या माध्यमातून बहुजन, दलित विशेषत: मातंग समाजात मोठं काम आहे.

महाराष्ट्रभर राष्ट्रवादी पक्ष वाढवणं, त्यातल्या त्यात दलित, उपेक्षीत, मातंग समाजात पक्षाचा विचार पोहचवणं या गोष्टीला प्राथमिकता देणार असल्याचं राजीव आवळेंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, "पवार साहेबांनी कायमच दलितांना आणि उपेक्षीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यांचे विचार तळागाळात पोहचवणे आणि उपेक्षीतांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करणार आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु आहे. अशा वेळी संविधान वाचवण्यासाठी पवार साहेबांना बळ देणं आवश्यक आहे."

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supreme Court  On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळलीABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Wardha Full Speech : राऊत - ठाकरे - पवारांवर हल्लाबोल, फडणवीस गरजले बरसले!Ramdas Kadam on Narayan Rane : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Embed widget