एक्स्प्लोर

माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन, प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'चे महत्त्वाचे शिलेदार 

अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मखराम पवार प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'च्या यशस्वीतेतील ते महत्त्वाचे शिलेदार होते.

अकोला :  अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 84 वर्ष होते. मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारादरम्यान रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मखराम पवार प्रकाश आंबेडकरांचे माजी सहकारी होते. आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'च्या यशस्वीतेतील ते महत्त्वाचे शिलेदार होते. बहुजन महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मखराम पवार कॅबिनेट मंत्री होते. प्रकाश आंबेडकरांशी मतभेद झाल्यानंतर पवार यांनी काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा राजकीय प्रवास केला आहे. मखराम पवार यांच्या पार्थिवावर उद्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या लोहगड या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहे. 

मखराम पवार यांचा राजकीय प्रवास : 
मखराम पवार यांचं राजकारण नव्वदच्या दशकात ऐन भरात होतं. मखराम पवार यांची वाटचाल सरकारी अधिकारी ते राजकारणी अन् मंत्री अशी राहिली आहे. ते आधी राज्य सरकारच्या विक्रीकर विभागात उपायुक्त होते. 1989 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. देशात मंडल आयोगाचे वारे वाहत असतांना त्यांनी ओबीसी आणि भटक्यांचे सोबत घेत राजकारण सुरू केलं. 1993 मध्ये त्यांनी 'बहुजन महासंघा'ची स्थापना केली.पुढे बहुजन महासंघ त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या 'भारिप'मध्ये विलीन केला. यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा 'भारिप-बहूजन महासंघ' असा नामविस्तार झाला. 

मखराम पवार हे 1990 मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यावर अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आलेत. यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय उदयाची निवडणूक ठरलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांची सक्रीय भूमिका होती. या पोटनिवडणुकीत भिमराव केराम यांच्या रूपाने प्रकाश आंबेडकरांचा पहिला आमदार विजयी झाला होता. 1995 ची निवडणूक मखराम पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघातून तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झालेले माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत अतिशय अल्प मतांनी मखराम पवार यांचा पराभव झाला. यानंतर 1999 मध्ये ते भारिप-बहूजन महासंघाच्या वतीने विधान परिषदेवर गेलेत. या कार्यकाळात विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात 27 ऑगस्ट 1999 ते 8 जानेवारी 2001 राज्याचे व्यापार, वाणिज्य, दारूबंदी कार्य आणि खनिकर्म खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. मात्र, 2001 मध्ये आंबेडकरांचे काँग्रेसशी मतभेद झालेत. यावेळी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असलेल्या मखराम पवार, डॉ. दशरथ भांडे आणि राज्यमंत्री रामदास बोडखेंना आंबेडकरांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या तिघांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर या तिघांचीही आंबेडकरांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर हे तिघेही काँग्रेसमध्ये सामिल झालेत. काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्षप्रवक्ते म्हणून त्यांनी जबादाऱ्यांना पार पाडल्यात.

पुढे 2009 मध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, भाजपमध्ये मन न रमल्याने त्यांनी 2013 मध्ये परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते राजकीयदृष्ट्या विजनवासात गेलेत.  त्यांचा मुलगा सतिश हा बार्शीटाकळी पंचायत समितीचा माजी उपसभापती आहे. 

मखराम पवार आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'चे महत्त्वाचे 'शिलेदार' :

प्रकाश आंबेडकरांचा 'भारिप' स्थापनेनंतर राजकीय प्रवास काहीसा धीम्या गतीनेच सुरू होता. परंतु त्यांचा पुढे अकोल्याशी संबंध आला, अन राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचे वारु चौफेर उधळायला लागले. नव्वदच्या दशकाची चाहुल लागत असतांनाच प्रकाश आंबेडकरांचा एका कार्यक्रमानिमित्तानं अकोल्याशी संबंध आला. या भेटीदरम्यान, प्रकाश आंबेडकरांना आंबेडकरी जनतेचं प्रचंड प्रेम, आस्था, आपुलकी अन् मान-सन्मान मिळाला. पुढे अकोल्यातील लंकेश्वर गुरुजी, बी.आर. सिरसाट आदी नेत्यांनी आंबेडकरांची भेट घेत त्यांना अकोल्याला आपली 'राजकीय कर्मभूमी' म्हणून निवडण्याची विनंती केली. पुढे प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात गाठी-भेटी वाढत गेल्या. त्यातून अकोल्यात 'भारिप' एक 'राजकीय चळवळ' म्हणून बाळसं धरायला लागली.

त्यांनी दलितांसह बहुजन वर्गाला सत्ताधारी होण्याची हाक दिली. सोबत साळी, माळी, कोष्टी, कुंभार,सुतार, लोहार, न्हावी, भोई, टाकोणकार, कोळी, पारधी अशा बारा बलुतेदार उपेक्षित घटकांची मोट बांधली. या सर्वांना सोबत घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरांनी प्रस्थापितांना धुळ चारायला सुरुवात केली. यावेळी 1991 मध्ये मखराम पवारांसह अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. यात पहिल्याच निवडणुकीत अकोला जिल्हा परिषदेत आंबेडकरांचे 13 सदस्य निवडून आलेत. तर अकोला आणि बार्शीटाकळी पंचायत समित्याही ताब्यात घेतल्यात. हाच राजकीय प्रयोग पुढे राज्यभरात 'अकोला पॅटर्न' नावानं ओळखला जाऊ लागला. पुढे 21 मार्च 1993 ला शेगाव येथे निळू फुले, राम नगरकर यांच्या उपस्थितीत 'भारिप' आणि 'बहूजन महासंघा'चं संयुक्त अधिवेशन झालं. या अधिवेशनात मखराम पवारांनी आपली संघटना 'बहुजन महासंघ' भारिपमध्ये विलीन केली. अन पुढे 'भारिप'चा नामविस्तार 'भारिप-बहूजन महासंघ' असा झाला. मखराम पवार यांच्या निधनाने बहुजनांच्या चळवळीतलं एक पर्व, एक इतिहास आज संपल्याची भावना त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतांना चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजीCabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंगCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special ReportDevendra Fadnavis Full PC : EVM ते खातेवाटप, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची तुफान बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget