एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नगर अर्बन बँकेची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी संगनमताने कट रचून बँकेची 3 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार तथा अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी (वय 45, रा. पाईपालाईन रोड, अहमदनगर) यांनी दिली. त्यानुसार अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी संगनमताने कट रचून बँकेची 3 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचून, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार करून ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केला आहे. सदर 3 कोटी रूपयांची रक्कम या आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेच्या 3 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.

आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केल्याप्रकरणी भादवी कलाम 406, 420, 465, 467, 471 व 120 ब प्रमाणे सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी आता कोतवाली पोलीस करत आहे. नगर अर्बन बँकेवर प्रशासक देखील नेमण्यात आला होता. आणि आता भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget