एक्स्प्लोर
किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं मद्य सेवन
महोत्सवासाठी आलेल्या शिवप्रेमींनी तशी तक्रार केल्यानंतर जुन्नर पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती महोत्सव साजरा होत असताना काल रात्री वनविभागाचे तीन ते चार कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले. महोत्सवासाठी आलेल्या शिवप्रेमींनी तशी तक्रार केल्यानंतर जुन्नर पोलीस पुढील तपास करत आहेत. खरं तर कोणत्याही किल्ल्यावर मद्य सेवनाच्या घटना घडू नयेत म्हणून वनविभागाने नजर ठेवणं गरजेचं असतं, मात्र तेच मद्य सेवन करून नियमाची पायमल्ली करत असल्याचं दिसून आलं. यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यातून आलेल्या शिवप्रेमींनी हा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पोलिसांनी सुरुवातीला माध्यमांना प्रकरणाची माहिती देण्यास नकार दिला, मात्र व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व परिस्थिती समोर आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा























