एक्स्प्लोर

शरद पवारांशी चर्चेनंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयास छावणी मालकाकडून तूर्तास स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी जे चारा छावणी मालक छावणी बंद करणार होते त्यांच्याशी चर्चादेखील केली.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी छावणी मालकांशी चर्चादेखील केली. छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु पावारांशी चर्चा केल्यानंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयास मालकांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना ते भेट देत आहेत. काल (रविवार, 13 मे) पवारांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याला भेट दिली. दुष्काळ दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात पवार यांनी बीड जिल्ह्याला भेट दिली आहे. पवारांनी आज बीडमधील चारा छावणीला भेट दिली. चारा छावणीच्या मालकासोबतच्या भेटीनंतर पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु मी त्यांना विनंती केली की छावणी बंद करु नका, आता ते थांबायला तयार आहेत पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला, येत्या चार-पाच दिवसात मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत मी त्यांच्यापुढे दुष्काळासंबधीचे सर्व प्रश्न मांडेन. राज्य आणि केंद्र सरकारकडे सहायतेसाठी आग्रह करणार आहे. दरम्यान काल माण तालुक्यातील चारा छावण्यांना दिलेल्या भेटीनंतर पावारांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावे, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, तिथे मुंबईत बसून व्याख्यानं आणि आव्हानं देत बसण्यापेक्षा राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे. तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठीदेखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येतं. चारा छावण्यांमध्येदेखील खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामं मिळत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget