एक्स्प्लोर
अकोल्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना बेड्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त
शहरातील मलकापूर येथील सन सिटी परिसरातील एका बंगल्यात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी या जागेवर धाड टाकली.

अकोला : अकोल्यातील मलकापूर परिसरातील एका बंगल्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पाच आरोपींना करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील मलकापूर येथील सन सिटी परिसरातील एका बंगल्यात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी या जागेवर धाड टाकली.
या धाडीत आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टा लावत असतांना पाच जण आढळून आले. या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. सुधीर सावंत, शाम हेडा असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत.
अकोला पोलिसांनी कारवाई दरम्यान मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही असा एकत्रित लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एटीसीचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement