अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट गाडीची धडक इतकी जोरदार होती की स्विफ्ट कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

शिर्डी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गवर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे हा अपघात झाला. स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरासमोर धडक होऊल हा अपघात झाला. पहाटे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट गाडीची धडक इतकी जोरदार होती की स्विफ्ट कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवासी जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स अहमदनगरहून औरंगाबादकडे जात होती तर स्विफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात होती. देवगड फाट्याजवळ दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे. मयत जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते आहे. अपघातात स्वीप्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्याने स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल केलं. परंतु सर्व पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे..Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
महत्त्वाच्या बातम्या






















