एक्स्प्लोर

उदगीर दगडफेक प्रकरणी पाच अटकेत, एका आरोपीकडून चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख नोटा जप्त

उदगीर दगडफेक प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पकडलेल्या आरोपींपैकी एकाकडे चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मंगळवारी (19 जानेवारी) झालेल्या दगडफेकीत पाच आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. साबेर याहिया पटेल, मुसा बागवान, मिर्झा पाशा बेग, शादुल निजाम शेख,अमीर अब्दुल रज्जाक चाऊस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी एकाकडे चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख किंमतीच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटा सापडल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे संदर्भ जोडले गेले आहेत.

दोन दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहारातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर जमावाने आक्रमक होत उदगीर येथे दगडफेक केली होती. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. काही लोक दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी दोन दिवसात कसून तपास करत यातील सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या.

काय होते प्रकरण? उदगीर शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या हैबतपूर येथे शफी अहमद सय्यद (वय 32) आणि त्यांच्या मित्रामध्ये भांडण झाले होते. शफी सय्यद यांना जास्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (19 जानेवारी) त्यांचा मृत्यू झाला. आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मग पोलिसांनी आश्वसन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तोपर्यंत शफीच्या नातेवाई आणि मित्रांनी उदगीर शहरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये बस, कार या वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेकजण जखमीही झाले आहेत. रस्त्यावरुन मार्गस्थ होणारे अनेकजण यामध्ये जखमी झाले होते. उदगीर पोलिसांना काहींना अटक केले आहे. शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या भांडणाने एकाचा बळी घेतला तर अनेकजण जखमी झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात असून सध्या स्थिती पूर्वपदावर आहे.

पोलिसांनी रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले यातील दगडफेक करणाऱ्या सूत्रधारांना अटक केली आहे. यात काही जणांची राजकीय पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडित असलेले हे लोक अचानकपणे एकत्र का आले? उदगीर शहरातील शांतता भंग करण्यामागे यांचा नेमका काय उद्देश होता? या मागे कटकारस्थान कोणी आणि का केले होते याचा तपास आता लातूर पोलीस करत आहेत. दगडफेकीची घटना घडल्यापासून लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे यांनी उदगीरात जातीने तपास कामात सक्रिय सहभाग घेतला आहे.

Stone Pelting in Udgir | आर्थिक व्यवहारातून मारहाण, एकाचा मृत्यू; मृताच्या नातेवाईकांकडून दगडफेक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget