एक्स्प्लोर
विमान निर्मितीला जागा मिळताच वर्षात पहिलं उड्डाण : अमोल यादव

मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारा डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विमान निर्मितीसाठी अमोल यांना राज्य सरकार पालघरमध्ये जागा देणार आहे. विमान कंपनीसाठी जागा हातात आल्यानंतर एक वर्षात पहिलं विमान (प्रोटोटाईप) उड्डाण करेल. एक वर्षाचा कालावधीही मला पुरेसा वाटतो, असं अमोल यादव म्हणाले. भारतीय बनावटीचं 19 सीटर विमान बनवण्याचा ध्यास अमोल यादव यांनी घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारनं त्यांना पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. MIDC च्या माध्यमातून अमोल यांना जमीन मिळणार आहे. वर्षभरानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.
‘हवाईजादा’ अमोल यादव यांच्या स्वप्नांना राज्य सरकारचे पंख !
अमोल यादव यांनी 'मेक इन इंडिया विक'मध्ये स्वतः तयार केलेलं विमान सादर केलं होतं. राज्य सरकारच्या निर्णयामुळे भारतीय बनावटीचं विमान बनवण्याचं अमोल यादवचं स्वप्न दृष्टिक्षेपात आलं आहे. देशात दोन प्रदेश जोडण्यासाठी हा विमान कारखाना महत्त्वाचा ठरणार आहे. ही जमीन हस्तांतरित करण्याचं काम लवकरात लवकर करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं अमोल यादवनी सांगितलं. या प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी फडणवीस पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिणार आहेत. सर्व परवानग्यांची पूर्तता होत आल्याचंही अमोल यांनी सांगितलं. येत्या 40 ते 45 दिवसात काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. विमान कंपनीसाठी जागा हातात आल्यानंतर एक वर्षात पहिलं विमान (प्रोटोटाईप) उड्डाण करेल. एक वर्षाचा कालावधीही मला पुरेसा वाटतो, असं अमोल यादव म्हणाले. इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ आणि फंड यांचा ताळमेळ साधून हे काम तडीस नेण्याचा प्रयत्न असेल.आणखी वाचा























