एक्स्प्लोर

Protest in Maharashtra : वर्षांचा पाहिलांच दिवस आंदोलनांचा; विविध मुद्यांच्या प्रश्नावर आज राज्यभरात पडसाद

Maharashtra News : 1 जानेवारी हा वर्षांचा पहिला दिवस चांगलाच गाजला तो विविध मुद्यांच्या प्रश्नावरील आंदोलनाने. त्यातील काही आंदोलनांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील बघायला मिळाले. 

Maharashtra News : 31 डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षांचे (New Year 2024) मोठ्या उत्साहात सर्वत्र स्वागत (New Year Celebration) करण्यात आले. 1 जानेवारी हा वर्षांचा पहिला दिवस अनेकांसाठी  नवे संकल्प, नवे स्वप्न आणि नव्या ध्येयकडे वाटचाल करणारा ठरत असतो. मात्र असे असले तरी आजचा वर्षांचा पहिला दिवस चांगलाच गाजला तो विविध मुद्यांच्या प्रश्नावरील आंदोलनाने. त्यातील काही आंदोलनांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील बघायला मिळाले. 

कुठे चक्का जाम, तर कुठे टायर पेटवले; नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलन

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. कुठे चक्का जाम केला जात आहे, तर कुठे टायर पेटवले जात आहे. त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे.  

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्रा

 वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सरकारला दिलेल्या 31 डिसेंबर पर्यंतच्या अल्टीमेटम नंतर आता  विदर्भवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज नागपूरच्या संविधान चौकात विदर्भवाद्यांनी एकत्र येत रस्ता अडवून धरला. त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 27 डिसेंबरपासून यांच संविधान चौकात विदर्भवाद्यांनी आमरण उपोषण केले होते. दरम्यान अनेक वृद्ध उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. या उपोषणाच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी सरकारला 31 डिसेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर गनिमीकावा केला जाईल, असा इशारा देखील विदर्भवाद्यांनी सरकारला दिला. त्यांच अनुषंगाने आज नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र केल्याचे चित्र आहे. 

कांदा निर्यातबंदीच्या धोरणाविरोधात चांदवडला 'प्रहार' आक्रमक

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ नाशिकच्या चांदवड येथील प्रहार शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. एकीकडे नववर्षाचे सर्वत्र स्वागत होत असतांना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याचे रोजच मरण होत आहे. हे मरण प्रतिकात्मक स्वरूपात सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सरकारला केव्हा जाग येणार? असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.

मानधन वाढ आणि पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन, महिनाभरापासून अंगणवाडी बंद

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना तुटपुंज मानधन मिळत आहे. त्या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना राज्य शासनाकडं करीत आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांकडं राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यानं भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी 4 नोव्हेंबरपासून अंगणवाडीतील बालकांना शिकविण्याचं काम बंद आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सुमारे दोन हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जेलभर आंदोलन केलं. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 

आंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन व निदर्शने

शासकीय सेवेत कायम करून घ्यावे, या मुख्य मागणीसाठी आयटक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो आंगणवाडी सेविकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करीत केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलाय.

पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीत स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक

पीकविम्याच्या मागणीसाठी अमरावतीत स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांच्या कार्यालयात भजन म्हणत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. पीकविम्याचा जो शेतकऱ्यांचे हक्क आहे तो त्यांना देण्यात यावा. अन्यथा हे आंदोलन असेच सुरू राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. मात्र आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच या आंदोलनाची एकच चर्चा होतांनाचे चित्र आहे. 

हेही वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget