एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या, पाण्याच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मैदानातील सर्वच्या सर्व 142 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं म्हटलं जात आहे. तर 25 ते 30 चारचाकी आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचा बाजार भरतो. मात्र आज तिथे एका स्टॉलला आग लागली. मैदानात साधारण 150 दुकानं आहेत. दुकानं एकमेकांना लागूनच असल्याने आग पसरली. आगीनंतर फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला आहे. या मैदानाच्या शेजारीच रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. रहिवासी परिसर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत. काय घडलं नेमकं? औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचं बाजर भरतो. यंदाही मैदानात फटाक्यांचे सुमारे 200 स्टॉल्स लागले होते. मात्र आज सकाळी 11.30 च्या सुमारास स्टॉल क्रमांक 49 आणि 50 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु दुकानं लागूनच असल्याने क्षणार्धात आग पसरली आणि सगळी दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चारचाकी, दुचाकी, रिक्षा खाक औरंगपुरा हा जिल्ह्यातील मध्यवर्ती भाग आहे. उद्या लक्ष्मीपूजन असल्याने औरंगाबादकर खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. फटाक्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या मैदानात नागरिकांची गर्दी होती. मात्र अचानक लागलेल्या आगीत दुकानांसह 25 ते 30 चारचाकी, अनेक दुचाकी आणि रिक्षा जळून खाक झाल्या आहेत. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण या मैदानाच्या शेजारी रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी भीतीमुळे तिथून पळ काढला आहे. आगीनंतर परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























