एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी चौघांवर गुन्हा
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी ललित बघेलसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील हसन बाग परिसरातील काँग्रेसच्या प्रचार सभेदरम्यान ही शाईफेक करण्यात आली होती. गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकाही व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही.
नागपुरात अशोक चव्हाणांवर शाईफेक केल्याप्रकरणी ललित बघेल या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र तो जखमी असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ललित बघेलवर रात्री उशिरा मुंबई पोलीस कायदा कलम 135 आणि 355 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ललित बघेलनं अन्य तिघांची नावंही घेतल्यानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मुख्य आरोपी ललित बघेल जखमी असल्यानं त्याला अटक करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तर अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. शाईफेक करणारा काँग्रेसचा कार्यकर्ताच असल्याचं बोललं जात आहे. मात्र काँग्रेसनं भाजप आणि संघावर निशाणा साधला आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच अशोक चव्हाणांवर शाईफेक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement