एक्स्प्लोर

कळंब पंचायत समिती वाद, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांसह 11 जणांवर गुन्हे दाखल

भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नासह काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : भाजप आमदार राणा जगजीत सिंह आणि शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटातील कळंब पंचायत समिती पळवापळवी वादाला आता वेगळे वळण लागलं आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांच्यानंतर आता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे भाजप-शिवेसेनेमधील वाद आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायत समिती निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहोचली असून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात तुळजापूर भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भाजप गटाचे तीन पंचायत समिती सदस्य शिवसेनेने अकलूज येथील बोरगावमध्ये आणल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारावर भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नासह काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी आमदार जगजीतसिंह यांची गाडी आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अटक केलेल्या आरोपींपैकी जिल्हा बँकेचे संचालक सतिष दंडणाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 11 जणांविरोधात अकलूज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ओमराजे निबांळकरांसह सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

कळंब पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10, आणि सहा सदस्य शिवसेनेचे आहेत. यातील राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब इथले पंचायत समिती सदस्य शिवसेनेनी पळवले. पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील आणि अकलूज मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवर्सन हाणामारीत झाले. यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावले. या प्रकरणी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी राणा जगजितसिंह पाटील यांच्या चार समर्थकांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget