एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकरी आत्महत्येप्रकरणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर गुन्हा दाखल
शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले.
उस्मानाबाद : शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केल्यामुळे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरुन खासदार निंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक आणि शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी खासदार निंबाळकर यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा नोंद झाल्यामुळे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले.
सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पहायला मिळतील, असेही आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे आणखी एका पत्रात त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेवून कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला आणि मयत शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठविली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याच्या अध्यक्ष आनंदीदेवी राजेनिंबाळकर, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशा एकूण 52 जणांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्यामुळे ढवळे यांची जमीन लिलावात निघाली होती. या तणावामुळे त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. लोकसभा निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येवून ठेपली असताना हा प्रकार घडल्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मयत ढवळे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून चौकशी केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शासन व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
Advertisement