एक्स्प्लोर

नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हे माफ, नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (2 डिसेंबर) नाणार इथल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते.

मुंबई : नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. नाणारसंदर्भात आपण ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेतल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. तसंच भविष्यात प्रत्येक ट्वीटला मुख्यमंत्री असाच प्रतिसाद देतील, असा उपरोधिक टोलाही नितेश राणेंनी लगावला. शिवसेनेचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे लावले होते, असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (2 डिसेंबर) नाणार इथल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. नाणार इथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होता. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मु्ंबईत विधानभवनातून थेट दिल्लीपर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी आरे इथल्या कारशेडला विरोध करत जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलक पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेतले. त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाणारवासियांना दिलासा दिला. संबंधित बातम्या CM Thackeray Nanar | आरेनंतर नाणार आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Embed widget