एक्स्प्लोर
खंडणी मागणाऱ्या जात पंंचायतीविरोधात नगरमध्ये गुन्हा

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शिर्डीत जात पंचायतीच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरमली जात पंचायतीच्या 10 जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . संगमनेर तालुक्यातील पारेगावात राहणाऱ्या हाटकर दाम्पत्याला आंतरजातीय विवाह केल्यामुळे जात पंचायतीनं बहिष्कृत केलं होतं. त्यामुळे हनुमंत हाटकर यांनी जात पंचायतीविरोधात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. जात पंचायतीनं हाटकर दाम्पत्याला समाजात परत घेण्यासाठी 27 लाख रुपयांची मागणी केली होती. जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल करत दहापैकी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























