एक्स्प्लोर
Advertisement
पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी भिडे गुरुजी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा
पुणे : पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला.
मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला. या प्रकाराची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भिडे गुरुजी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
परंतु असा प्रकार पुन्हा घडणार नाही. इथून पुढे कोणतीही संघटना पालखीच्या मार्गात घुसणार नाही, असं लेखी हमीपत्र डेक्कन पोलिसांनी ज्ञानोबा माऊली पालखी प्रशासनाला दिलं. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची मार्गस्थ झाली आणि पुणे मुक्कामी पोहोचली.
वारीत गोंधळ झाला नाही : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
गेली चार वर्ष संभाजी भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वारकरी धारकरी संगम हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही केवळ ज्ञानोबा, तुकोबांच्या दर्शनासाठी या वारीत सहभागी होत असतो. वारीत कोणताही गोंधळ झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारे तलवारीही नेण्यात आल्या नव्हत्या, असं स्पष्टीकरण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
सोलापूर
Advertisement