एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फूड डिलिव्हरी करणाऱ्या बॉईजची आरोग्य तपासणी बंधनकारक, एफडीएचे आदेश
डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी करून त्यांची नोंदणी अन्न व औषध विभागाकडे करायची आहे.
नागपूर : खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या फूड डिलेव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे झोमॅटो, उबर इट्स आणि स्विगीसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी त्यांच्या डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तज्ज्ञाकडून आरोग्य तपासणी करुन घेणे बंधनकारक झाले आहे. ही तपासणी झाल्यानंतर डिलिव्हरी बॉईजची नोंदणीही बंधनकारक करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलिव्हरीचा व्यवसाय मोठ्या तेजीत आहे. खाद्यपदार्थांची ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्यामध्ये झोमॅटो, उबर इट्स आणि स्विगी सारख्या ख्यातनाम कंपन्या कार्यरत आहेत. ग्राहकांकडून मोबाईल अपच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलमधून ते खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कंपन्यांच्या फूड डिलिव्हरी बॉईजची असते.
हॉटेलमध्ये तयार केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर भलेही एफडीएची नजर असली तरी संबंधित डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्याबद्दल कोणतीही माहिती सध्यातरी एफडीए किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे उपलब्ध नव्हती. हॉटेलमधून तुमचे आवडते खाद्य पदार्थ घेऊन येणाऱ्या या फूड डिलिव्हरी बॉईजना कुठला आजार किंवा संसर्गजन्य रोग आहे का? ते खाद्य पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी फीट आहेत का? हे तपासण्याची कुठलीच व्यवस्था आता पर्यंत नव्हती.
त्यामुळेच डिजिटल युगात तीव्रतेने प्रचलित होत असलेल्या या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी खाद्य पदार्थांची ने-आण करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजच्या सखोल वैद्यकीय तपासणीचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहे.
या वैद्यकीय तपासणीमध्ये संबंधित डिलिव्हरी बॉय शारीरिक दृष्ट्या फीट आहे की नाही हे तर तपासले जाणारच आहे. शिवाय त्याला कुठले संसर्गजन्य आजार तर नाहीत ना याचीही तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय वैद्यकीय तज्ज्ञ या डिलिव्हरी बॉईजना त्यांच्या दैनंदिन सवयीचा भाग म्हणून स्वच्छतेबाबत काही टिप्सही देतील.
विशेष म्हणजे डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी करून त्यांची नोंदणी अन्न व औषध विभागाकडे करायची आहे. एफडीएच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा देखील कंपन्यांवर विश्वास वाढेल असे सांगत डिलिव्हरी बॉईजनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement