एक्स्प्लोर

कर्जबाजारी वडिलांवरील वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे मुलीची आत्महत्या

शिक्षणाचा वाढता खर्च शेतकऱ्यांना न झेपणारा झाला आहे. याच वाढत्या दडपणाखाली येऊन अनिशा लावतेने जीवन संपवलं.

पंढरपूर : कर्जबाजारी वडिलांवर शिक्षणाच्या वाढलेल्या खर्चाचा भार नको म्हणून 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात घडली. डिप्लोमाचं शिक्षण घेत असलेल्या अनिशा लवटे हीने हे टोकाचं पाऊल उचललं. शिक्षणाचा वाढता खर्च शेतकऱ्यांना न झेपणारा झाला आहे. याच वाढत्या दडपणाखाली येऊन अनिशा लावतेने जीवन संपवलं. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात हनुमंत लवटे यांचं कुटुंब एक एकर शेतीवर आपली उपजिविका भागवतं. सलग दोन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर झालेली गारपीट यामुळे त्यांच्या एक एकर शेतीतील द्राक्षाची बाग जाळून गेली. यामुळे घरावरील कर्ज वाढत चाललं होतं. शेतीच्या अशा बेभरवशी व्यवसायामुळे लवटे यांनी आपल्या तीनही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांची मोठी मुलगी सांगोल्यातील एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर दुसरी अनिशा तासगाव येथे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. लहान मुलगा देखील वारणा येथे शिकायला ठेवल्याने कुटुंबावर खर्चाचा ताण वाढला होता.  शेतीत झालेलं नुकसान, त्यामुळे वाढलेलं कर्ज यातच या तीनही मुलांच्या शिक्षणामुळे वडिलांवरील कर्ज वाढत असल्याची भावना अनिशाची झाली होती. यातूनच तिच्या फीच्या रकमेची व्यवस्था न झाल्याने कॉलेजला जाणं लांबत चाललं होतं. वडिलांची परवड असह्य झाल्याने अखेर अनिशाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी तिने शिक्षणाचा खर्च वडिलांना पेलवत नसल्याने आत्महत्या करत असून यास कोणाला जबाबदार धरु नये अशी चिठ्ठी लिहून ठेवली. गरीब शेतकऱ्यांना आता मुलांचं शिक्षण हीच गुंतवणूक वाटू लागली आहे. कर्ज काढून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा कुटुंबाची धडपड सुरु असते. मात्र आई-वडिलांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी झालेला हा त्रास असह्य झाल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नैराश्य येतं. त्यामुळे सरकारी योजना आणि शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळाला तर अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget