एक्स्प्लोर
गडचिरोलीत सुनेच्या विजयी मिरवणुकीत सासऱ्याला हार्ट अटॅक
![गडचिरोलीत सुनेच्या विजयी मिरवणुकीत सासऱ्याला हार्ट अटॅक Father In Law Dies Due To Heart Attack In Daughter In Laws Winning Procession गडचिरोलीत सुनेच्या विजयी मिरवणुकीत सासऱ्याला हार्ट अटॅक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/05114036/voting.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गडचिरोली : गडचिरोलीत विजयी उमेदवाराच्या जल्लोषात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
गडचिरोलीतील प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा आखाडे विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे सासरे सुरेश आखाडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. या गडचिरोलीत भाजपने मुसंडी मारली आहे. गडचिरोलीत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. मात्र विजय उमेदवाराच्या सासऱ्याच्या मृत्यूने एकीकडे आनंद तर दुसरीकडे दु:खाचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)