एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार!
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे की नाही, असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे की नाही, असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
फॉर्म भरताना शेतकऱ्यांना OTP क्रमांक जनरेट करावा लागणार आहे. शेतकरी शेतात जाणार की तालुक्याच्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरतील. इंटरनेट सर्व भागांमध्ये उपलब्ध नाही. कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला एवढ्या अडचणी येत आहेत, तर शेतकरी हा फॉर्म कसा भरणार, असा सवाल सतेज पाटील यांनी केला.
http://polldaddy.com/poll/9795694/
सरकार निवडणूक समोर ठेवून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत असल्याचा आरोपही सतेज पाटील यांनी केलाय. घरात 18 वर्षांखाली आणि त्यावरील अपत्यांची माहिती मागितली जात आहे. 89 लाख शेतकरी आणि त्यांची माहिती सरकार निवडणुकीसाठी गोळा करत असल्याचा घणाघाती आरोप सतेज पाटील यांनी केलाय.
हा फॉर्म सोपा असल्याचा दावा सरकार करत असेल, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी हा फॉर्म भरून दाखवावा, मी त्यांचा सत्कार करेन, असं आव्हानही सतेज पाटील यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement