एक्स्प्लोर
पीक विमा भरण्यासाठी विलंब, संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक
पीक विमा भरण्यासाठी लागत असलेल्या वेळेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी परभणी जिंतूर महामार्गावरील बोरी येथे रास्ता रोको आंदोलन केले असून, संतप्त शेतकऱ्यांनी बँकेवर दगडफेक केली. त्यातून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार केला.
परभणी : पीक विमा भरण्यासाठी लागत असलेल्या वेळेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी परभणी जिंतूर महामार्गावरील बोरी येथे रस्ता रोको आंदोलन केले असून, संतप्त शेतकऱ्यांनी बँकेवर दगडफेक केली. त्यातून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार केला.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बोरी शाखेत शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी रंगा लावल्या होत्या. पण ऑनलाईन प्रक्रियेमुळे त्याला मोठा वेळ लागत होता. त्यातून अनेक शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते होते. यातून बँकेने आणखी काही टेबलवर ही सुविधा सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पण बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्याचे करण देत शाखा व्यवस्थापक यांनी याला नकार दिला.
त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला. राज्य महामार्गावरच ही बँक असल्याने त्यांच्या समोरच हे आंदोलन सुरू केले. त्यावर पोलिसांनी महामार्गावरुन शेतकऱ्यांना बाजूला करण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र, शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेवर दगडफेक केली. त्यामुळे शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement