Farmer Suicide :शेतातील पीक पावसामुळे न उगवल्याने दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या
शेतकरी दाम्पत्याने बुधवारी 7 जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
![Farmer Suicide :शेतातील पीक पावसामुळे न उगवल्याने दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या Farmer Couple commits suicide by drinking poison in buldhana Farmer Suicide :शेतातील पीक पावसामुळे न उगवल्याने दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/10/97ba37b191de9fd4a9fdfcf34437aa08_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलडाणा : आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करुनही पावसाअभावी पीक उगवले नाही, म्हणून तिबार पेरणीसाठी आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले असल्याची घटना चिखली तालुक्यातील कारखेड येथे घडली आहे. या घटनेने मात्र संपुर्ण बुलडाणा जिल्हा हादरला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या कारखेड येथील 60 वर्षीय शेषराव मंजुळकार आणि 51 वर्षीय जनाबाई मंजुळकार अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी शेषराव मंजुळकार याची पत्नी जनाबाई यांचा गुरुवारी 8 जुलैच्या रात्री 9 वाजता तर शेतकरी शेषराव मंजुळकार यांचा शुक्रवारी 9 जुलैला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या शेतकरी दाम्पत्याने बुधवारी 7 जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
चिखली तालुक्याच्या कारखेड येथील मंजुळकार दाम्पत्यांकडे दोन एकर शेती असून यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली. मात्र ते उगवले नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, मात्र ते उगवलेले असतांनाही पावसाअभावी मात्र पीक करपून गेले. आणि आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. दोन्ही वेळा पेरणी केली तर जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेत असल्याने दोघांनी बुधवारी 7 जुलै रोजी विष घेतले होते. त्यांना उपचारासाठी त्तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे दोघांचा उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला.
या कुटुंबाकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसेच चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करणे हा त्यांचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायू आजार झालेला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते आणि याचा त्यांना ताण आला असावा आणि यामध्येच दोघांनी विष घेतले असावे, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र या घटनेने संपूर्ण जिल्हा हदरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)