एक्स्प्लोर
प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने वाळीत टाकलं
दिनेश पवार याने सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र वैदू समाजाच्या स्थानिक जातपंचायतीने या जोडप्याला समाजात घ्यायला नकार दिला.
नाशिक : प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबाला वाळीत टाकण्याची घटना नाशिक जिल्हयातील सटाणा तालुक्यात घडली. दिनेश पवार या तरुणाने स्वजातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने वैदू समाजाच्या जातपंचायतीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं.
सटाणा शहरालगत मळगाव येथे वैदू समाजाची दहा ते बारा घरं आहेत. याच ठिकाणी राहणाऱ्या दिनेश पवार याने सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र वैदू समाजाच्या स्थानिक जातपंचायतीने या जोडप्याला समाजात घ्यायला नकार दिला.
आता या तरुणाने जातपंचायतीविरोधात सटाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
‘प्रेमविवाह केलेल्या दिनेशला घरात घेतलं तर तुम्हाला समाजातून बहिष्कृत करु,’ असा दमही जातपंचायतीने पवार कुटुंबाला दिला. त्यामुळे घरच्यांना त्रास नको म्हणून दिनेश आणि त्याची पत्नी सुनंदा दोघे मालेगावमध्ये राहण्यासाठी गेले आहेत.
दिनेशच्या वडिलांना तोंडाचा कॅन्सर असल्याने त्यांना भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता. यासाठी घरच्यांनी जातपंचायतीकडे मुलाला घरी आणण्याची परवानगी मागितली. मात्र जातीच्या ठेकेदारांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.
दिनेशच्या कुटुंबाने सुमारे एक लाख रुपये दिल्यानंतर जातपंचायतीतील लोकांनी दिनेशला घरात घेण्याची परवानगी पवार कुटुंबीयाला दिली. पण दिनेश आपल्या वडिलांकडे आल्यावर मुलाला आपल्या घरात ठेवलं तर तुम्हाला सुद्धा समाजातून बहिष्कृत करु, असं जातपंचायतीकडून पवार कुटुंबाला सांगण्यात आलं.
वारंवार पैसे मागण्याचा जाच या कुटुंबाला सहन करावा लागल्याने अखेर दिनेश आणि त्यांची पत्नी सुनंदा यांनी मालेगाव येथे महिला समुपदेशन केंद्रात गेले. तेथील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार दिनेशने सटाणा पोलिस स्टेशनमध्ये जातपंचायतीविरोधात तक्रार नोंदवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement