Pooja Chavan Suicide | मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं नाही, फडणवीसांचा आरोप
पूजा चव्हाण प्रकरणावरुन (Pooja Chavan Suicide मcase) देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून त्यांनी संबंधित मंत्र्याची कॅबिनेटमधून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
![Pooja Chavan Suicide | मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं नाही, फडणवीसांचा आरोप Fadnavis alleged that CM did not realize the seriousness of the Pooja Chavan case Pooja Chavan Suicide | मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं नाही, फडणवीसांचा आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/01034223/Devendra-Fadanvis-Uddhav-Thackeray-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर: राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं नाही असा जळजळीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते. राज्याच्या एका मंत्र्यावर असा गंभीर आरोप होत असताना त्याला मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही, ताबडतोब त्याची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं नसल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की, "राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, यामुळे कोणाचे आयुष्य उद्धस्त होत आहे हे त्यांच्या लक्षात येईल."
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी जी आवश्यक कारवाई केली पाहिजे ती त्यांनी केली नाही असं. या प्रकरणात पोलिसांनी सुमोटो कारवाई करणं अपेक्षित आहे. अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने पोलीस कोणत्या दबावात आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या प्रकरणात बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे आता सगळ्यांना माहित झालंय. ते आता पोलिसांनी स्पष्ट करावं. पण पोलिसांकडून हे सर्व लपवलं जात आहे. सर्वप्रथम या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे."
22 वर्षांची पूजा चव्हाण अल्पावधीतच आधी समाजकार्य अन् नंतर राजकारणात आली कशी?
संबंधित मंत्र्याची कॅबिनेटमधून हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कॅबिनेटमध्ये राहिल्याने या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी होणार नाही, पोलिसांवर दबाव राहिल. पोलिसांवरील हा दबाव मुख्यमंत्र्यांनी दूर केला पाहिजे."
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेला असतांना मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकारवर टीका होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)