(Source: ECI/ABP News/ABP Majha)
22 वर्षांची पूजा चव्हाण अल्पावधीतच आधी समाजकार्य अन् नंतर राजकारणात आली कशी?
बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण हिने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, 22 वर्षाची पूजा चव्हाण अल्पावधीतच आधी समाजकार्य आणि राजकारणात आली कशी?
बीड : पुणे शहरातील वानवडी परिसरात 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पूजा चव्हाण असं या तरूणीचं नाव होतं. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असतांना आणखी मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी मधली पूजा पुण्यापर्यंत आली कशी? कसं होतं तिचं आयुष्य? पाहूया माझाचा स्पेशल रिपोर्ट.
पूजा चव्हाण हिचे पहिली ते चौथी शिक्षण परळीमध्येच झाले. त्यानंतर 5 ते 12 पर्यंतचे शिक्षण वैद्यनाथ विद्यालय, परळी येथेच झाले. तिला शालेय जीवणापासून समाज सेवा आणि सर्वसामान्यांना मदत करायला आवडत होते. त्यामुळे तिने समाज कार्य हे क्षेत्र निवडले. वसंतराव नाईक आणि सेवालाल महाराज यांच्या जयंतीमध्ये तिचा सहभाग असायचा. पूजा ही प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची समर्थक होती. त्यामुळे त्यांच्या प्रचारात आणि त्यांच्या सभांमध्ये पूजा त्यांच्यासोबत स्टेजवर नेहमीच दिसायची.
कुक्कुटपालन व्यवसायात पूजाची वडिलांना मदत परळीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंत नगर तांड्यावर पूजाचे आजोळ आहे. याच ठिकाणी पूजाच्या वडिलांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आणि या व्यवसायावरच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बँकेतून 25 लाखांचं लोन काढून कुक्कुटपालनाच्या व्यवसायात ती वडिलांना मदत करत होती. पूजासह एकूण पाच बहिणी आहेत. त्यापैकी चार बहिणींचं लग्न झालं आहे. पूजा पाचवी मुलगी आणि सहावी आणखी एक मुलगी आहे. पूजाचं बीएड झालं होतं आणि पुढचा कोर्स करण्यासाठी ती पुण्याला गेली होती.
काय आहे प्रकरण? 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.
डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू, शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सुपूर्द