एक्स्प्लोर
Advertisement
पैशांच्या पावसासाठी नरबळीचा प्रयत्न, शिक्षकासह तिघेजण अटकेत
आरोपींमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. सुधाकर राजाराम सोळंके असे या शिक्षकाचे नाव आहे.
अकोला : पैशांच्या पावसासाठी नरबळीच्या प्रयत्न करु पाहणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. सुधाकर राजाराम सोळंके असे या शिक्षकाचे नाव आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी काल (22 ऑगस्ट) रात्री ही कारवाई केली.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य संघटक पुरुषोत्तम आवारे-पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नरबळीचा प्रयत्न करणाऱ्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधाकर राजाराम सोळंके हा शिक्षकच आहे. तो अकोल्याच्या देशमुखफैल भागात असलेल्या शिवाजी शाळेत शिक्षक आहे. याशिवाय पोलिसांनी त्याचे साथीदार असणाऱ्या शंकर मदनकार आणि अमोल चव्हाण यांनाही अटक केली.
ही टोळी नरबळी देण्यासाठी 25 ते 30 वयोगटातील अविवाहित तरुणाच्या शोधात होती. या टोळीने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील धनजलगतच्या एका तांत्रिकाचीही मदत घेऊ केली होती. या संपूर्ण प्लानची कुणकुण अकोल्यातील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यांच्या पोलीस तक्रारीवरुन एक मोठा गुन्हा घडण्याआधीच उघडकीस आली.
दरम्यान, पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून 'आप'नेते मुकीम अहमद यांची झालेली हत्या, संपत्तीच्या वादातून झालोली भारिप-बहुजन संघाचे नेते आसिफखान यांची हत्या आणि काल अकोला पोलिसांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांची अटक... अकोल्यातील अलिकडच्या काही घटना समाजमन हादरविणाऱ्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement