एक्स्प्लोर
अंबाबाईच्या पगारी पुजाऱ्यांसाठी आज परीक्षा, 113 जण रिंगणात
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात पगारी पुजारी आणि सेवक पदासाठी आज परीक्षा आहे.

कोल्हापूर: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय, देवस्थान समितीने राज्य शासनाच्या आदेशानंतर घेतला. त्यानंतर आज पगारी पुजारी नेमण्याची भरती प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात पगारी पुजारी आणि सेवक पदासाठी आज परीक्षा आहे. 113 उमेदवार ही परिक्षा देणार आहेत. यामध्ये 6 महिलांचाही समावेश आहे. मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे. परीक्षा कशी असेल? परीक्षेसाठी 113 उमेदवार एकूण 25 गुणांची मुलाखत. हिंदू उमेदवारच परीक्षेसाठी पात्र उमेदवाराला गावातील पोलीस पाटलांकडून किंवा स्थानिक पोलिस ठाण्यातून वर्तणुकीचा दाखला घेणे बंधनकार. उमेदवाराला शाहू वैदिक स्कूलची मान्यता असणे आवश्यक उमेदवार संपूर्ण शाकाहारी असावा. धर्मशास्त्राचा अभ्यासक असावा पूर्वानुभव महत्वाचा यातून 55 उमेदवार निवडले जाणार. परीक्षा घेणारी निवड समिती डॉ. शिवदास जाधव (अभ्यासक) गणेश नेर्लेकर (तज्ज्ञ) विजय जाधव (विधी व न्याय विभाग प्रतिनिधी) शिवाजी जाधव (सदस्य देवस्थान समिती) संगिता खाडे (सदस्य देवस्थान समिती) देवस्थान समितीचे अध्यक्ष किंवा करवीर पिठाचे प्रतिनिधी . सकाळी – 10.30 ते सायंकाळी 5. वाजेपर्यत मुलाखती. परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे मुद्दे 1) सप्तशती चंडी पाठ 2) श्रीयंत्रविद्या पूजा 3) वेदोक्त षोडशोपचार 4) राजोपच्चार 5) चंडी हावन 6) देवी भागवत पुराण 7) नवरात्री पूजा विधी 8) मुद्रान्यास 9) मंत्रोच्चार 10)अभिषेक पूजा यासह अन्य प्रश्न विचारले जाणार आहेत. 100 वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये सर्व जातींचे पुजारी असावे आणि या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण मिळावं, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदिक स्कूलची स्थापना केली होती. त्यानंतर आता या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. करवीर निवासीनी अंबाबाई देवीला मागील वर्षी श्री पूजक अजित ठाणेकर यांनी घागरा चोळी नेसवली होती. याविरोधात कोल्हापुरात मोठं आंदोलन सुरु झालं आणि मंदिरातील पुजारी हटाव अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूर, शिर्डी मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेतला. मंदिरातील पगारी पुजारी या पदासाठी आजपर्यंत 113 अर्ज आले असून यामध्ये 6 महिला पुजाऱ्यांचे अर्ज आहेत. तर मंदिरातील काजसाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे. या निवड प्रक्रियेत सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. पगारी पुजारी नेमाणुकीसाठी सात सदस्यांची कमिटी करण्यात आली आहे. हे सदस्य या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. संबंधित बातम्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी, विधेयक मंजूर कोल्हापुरात चंद्रकांतदादांसमोरच अंबाबाईच्या श्रीपूजकाला मारहाण अंबाबाईच्या गाभाऱ्यातून पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी, भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये झटापट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























