Sachin Vaze : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या जीवाला धोका; जेल प्रशासनाची न्यायालयात माहिती
Sachin Vaze : सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती तळजो जेल प्रशानाने (Taloja jail Administration) न्यायालयाला दिली आहे.
मुंबई : निलंबित माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती तळजो जेल प्रशानाने (Taloja jail Administration) न्यायालयाला दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपात सचिन वाझे माफीचे साक्षीदार झाले आहेत.
वाझे यांना रोज-रोज मुंबई सत्र न्यायालयात सुनवणीसाठी हजर करता येणे शक्य नसल्याचे तळोजा जेल प्रशासनाकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात सांगण्यात आले. कोर्टाने जेल प्रशासनाची विनंती मंजूर केली आहे. तर सुनावणीसाठी नियमित कोर्टात आणण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्याची वाझेची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
सुनावणीसाठी नियमित कोर्टात आणण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्यात यावेत अशी मागणी वाझे यांनी केली होती. परंतु, विशेष न्यायालयाने कारागृह प्रशासनाचं म्हणणं योग्य ठरवून वाझेंची मागणी फेटाळली.
आवश्यकता असेल त्याचवेळी वाझे यांना सुनावणीसाठी हजर करण्यात यावे असे आदे कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
अँटीलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तर माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे माफीचे साक्षीदार बनले आहेत. याच प्रकरणी वाझे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती जेल प्रशासनाने न्यायालयाला दिली आहे.
सचिन वाझे सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. या बरोबरच भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथिक कोठडी मृत्यू प्रकरणातही वाझे आरोपी आहेत.
आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात 4 एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.