एक्स्प्लोर
कोल्हापुरात माजी उपमहापौर आणि आमदाराच्या नातेवाईकाचा भररस्त्यात धिंगाणा
कोल्हापूर: कोल्हापुरात काँग्रेसच्या माजी उपमहापौरानं दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. रविवारी रात्री दिगंबर फराकटे हे दुचाकीवरुन पद्माचित्र मंदिरात आले. येथे त्यांनी सिगरेट घेण्याच्या कारणावरुन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नातेवाईकांशी वाद घातला.
राजेश क्षीरसागर यांचे नातेवाईकही मद्यधुंद अवस्थेत असल्यानं कोणीच माघार तयार नव्हतं. शेवटी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याच्या तयारीत असतानाच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी जमावाला पांगवत कार्यकर्त्यांकडून लाठ्या जमा केल्या. दरम्यान याप्रकरणी अद्यापर्यंत कोणावरच कारवाई करण्यात आलेली नाही..
दरम्यान, किरकोळ कारणावरुन दंगा घातल्यानं बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती. घटनेचं गांर्भीय ओळखून लक्ष्मीपुरी पोलिसांनी तात्काळ वाद मिटवल्यानं पुढील अनर्थ टळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement