कोरोनावर लसीची वाट न पाहता प्रत्येकाने फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम केलं पाहिजे : डॉ रमण गंगाखेडकर
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचं आहे. कोरोनासंदर्भातील हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिगं ठेवणे असा नियमांचं पालन न करणे योग्य होणार नाही, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.
परभणी : कोरोना व्हायरसमुळे राज्यात आणि देशात भीतीचं वातावरण आहे. अनलॉकमुळे अनेक गोष्टी पूर्ववत होत आहेत. मात्र कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी नागरिकांनी लस तयार होण्याची वाट पाहू नये. फ्रंटलाईन वॉरिअर बनून स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पच्या (नाहेप) वतीने आयोजित केलेल्या 'कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावर परिणाम' या विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.
आज प्रत्येकाला फ्रंटलाईन वॉरिअर बनण्याची संधी आहे. कोरोनाची प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे. मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सगळं सुरळीत व्हायला 2021 उजाडणार आहे. त्यामुळे कोरोनासाठीच्या लसीची वाट न पाहता प्रत्येकाने फ्रंटलाईन वॉरियर बनून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. शिवाय समाजातील ज्येष्ठ, वयोवृद्ध लोकांनाही पुढे येऊन मदत केली पाहिजे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचं आहे. कोरोनासंदर्भात हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिगं ठेवणे असा नियमांचं पालन न करणे योग्य होणार नाही, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.
कंटेन्मेंट झोनमधील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबतच्या 'त्या' सर्व्हे अहवालाचं ICMR कडून खंडन
जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना नवीन सुरक्षित जीवनपद्धती समजली असेल. या सुरक्षित जीवनशैलीचं लोक यापुढे पालन करतील अशी सरकारला अपेक्षा आहे, म्हणून सरकारने लॉकडाऊन उठवलं असल्याचं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं.
Corona Updates | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 90 हजारांवर ; आज 1663 रुग्ण कोरोनामुक्त
Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट