एक्स्प्लोर

Nagpur ZP : बदलीनुसार 'टेबल' बदलले मात्र 'काम' तेच; नागपूर जिल्हा परिषदेत मर्जीतील कर्मचाऱ्यांवर 'विशेष कृपा'

Nagpur ZP : जिल्हा परिषदेत विभागनिहाय फेरआढाव्याची गरज असून विविध विभागात कार्यरत कर्मचारी किती वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. याचा विभागनिहाय फेरआढावा घेण्याची गरज आहे.

Nagpur ZP News : नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने गैरप्रकारांना आळा बसावा, तसेच कर्मचाऱ्यांची विभागातील मक्तेदारी कमी व्हावी, यासाठी तीन वर्षाहून अधिक काळापासून एकाच टेबलवर कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु काही विभागप्रमुखांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांची बदली केली; पण टेबल जुनाच कायम ठेवला असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषद वर्तुळात जोरदार उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) पारशिवनी पंचायत समितीत पेन्शन घोटाळा उघडकीस आला. यातील सूत्रधार महिला कर्मचारी सरिता नेवारे एकाच टेबलवर आठ वर्षापासून ठाण मांडून होत्या. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तीन वर्षाहून अधिक कालावधीपासून एकाच टेबलवर कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात बदलीच्या नावाखाली काहींचा टेबल बदलण्यात आला. परंतु काम जुनेच करीत असल्याची माहिती आहे. तर काही विभागात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी आपला टेबल सोडण्यास तयार नाही. काही विभागात पद व अधिकारापेक्षा कोणता टेबल कुणाकडे आहे. याला अधिक महत्त्व आहे. यावर 'अर्थपूर्ण 'व्यवहार अवलंबून असल्याचं बोललं जातं. यातूनच पारशिवनी पंचायत समितीत पेन्शन घोटाळा घडला होता. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असतानाही बदल्यांची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. प्रशासनाने याला आळा घालण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

विभागनिहाय फेरआढाव्याची गरज जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी किती वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. याचा विभागनिहाय फेरआढावा घेण्याची गरज आहे. तीन वर्षाहून अधिक कालावधीपासून एकाच टेबलवर असलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करण्याची गरज आहे.

मुख्य आरोपीकडून 70 लाखांची जप्ती

नागपूर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीच्या पेंशन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 30 बोगस खाती समोर आली आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (Economic Offenses Wing) 24 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी महिला कर्मचारी सरिता नेवारेसह खैरकर नामक लेखाधिकारी यालाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी मुख्य सूत्रधार सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागिने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ कार जप्त केली आहे. हा मुद्देमाल 60 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहे.

ही बातमी देखील वाचा...

नागपुरात उड्डाणपुलावर आणखी एक अपघात ; अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget