एक्स्प्लोर
Advertisement
27 लाखांची नोकरी सोडून इंजिनिअर दाम्पत्य झाले चहा विक्रेते
नागपुरात लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून एक इंजिनिअर दाम्पत्य चहा विक्रेते झाले.
नागपूर : कोई भी काम छोटा या बडा नही होता... 'रईस' चित्रपटातला हा प्रसिद्ध डायलॉग... मात्र हा डायलॉग खरा करुन दाखवला नागपूरच्या एका इंजिनिअर दाम्पत्यानं. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली.
चहावाला पंतप्रधान झाल्याचं तुम्ही पाहिलंत, मात्र नागपुरात एक इंजिनिअर दाम्पत्य चहा विक्रेते झाले. नितीन आणि पूजा बियाणी हे 'चाय व्हिला'चे मालक.
दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स... नितीनने बीईनंतर एमटेक पूर्ण केलं. पूजाही 'एक्सफो'मध्ये इंजिनिअर. दोघांचा मिळून 27 लाख रुपये पगार... पण इंजिनिअरिंग सोडून दोघांनी चहा करण्याची वाट धरली.
कोट्यवधींची दौलत लाथाडून 'त्या'ने बाराव्या वर्षी संन्यास घेतला
नागपूरच्या 'सेंट्रल अव्हेन्यू'मध्ये 20 फ्लेव्हर्सचा चहा मिळतो. महिन्याभरात पाच लाख रुपयांचा चहा त्यांनी विकला. तर पाच महिन्यात 15 लाखांचा. या इंजिनिअर दाम्पत्याने चाय व्हिलाला ऑनलाईन खरेदीची जोड दिली आहे. अगदी 8 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत... कटिंगपासून फुल कप चहा तुम्हाला मिळू शकतो. बियाणी दाम्पत्याच्या या चाय व्हिलाने पुन्हा एकदा पटवून दिलं, की कोई भी धंदा छोटा या बडा नही होता..अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement