अंत्यसंस्काराला विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी योग्य पर्याय नाही; राज ठाकरेंच्या मुद्द्यावर पर्यावरण प्रेमीने दिले समर्पक उत्तर, म्हणाले...
अंत्यसंस्कारामध्ये लागणाऱ्या प्रचंड लाकडाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उभा केला. दरम्यान, या समस्येवर एक समर्पक उत्तर विजय लिमये यांनी दिले आहे.
Nagpur News नागपूर : अंत्यसंस्कारामध्ये लागणाऱ्या प्रचंड लाकडाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांचा मुद्दा मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी उभा केला. दरम्यान, या समस्येवरचा काय उपाय असू शकतो याचा एक समर्पक उत्तर इको फ्रेंडली लाइफ फाउंडेशन चे विजय लिमये यांनी दिले आहे. विजय लिमये गेली अनेक दशके अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर नको, अंत्यसंस्कार पर्यावरण पूरक पद्धतीने व्हायला हवे, यासाठी ते केवळ जनजागृतीच करत नाहीये, तर त्यांनी त्या संदर्भातला एक पर्यावरण पूरक आणि स्वस्त असा पर्यायही शोधून काढला आहे.
विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्याय नाही- विजय लिमये
शेतातील पालापाचोळा आणि विविध पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेला पिकांचा भाग यापासून विजय लिमये यांनी मोक्षकाष्ठ अशा नावाने विशेष विटा बनवल्या आहेत. पूर्णपणे जैविक पद्धतीने तयार करण्यात आलेलं मोक्षकाष्ठ लाकडापासून केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरण पूरकही आहेत. त्यामुळे मोक्ष काष्ठच्या माध्यमातून केले जाणारे अंत्यसंस्कार पर्यावरणाची हानी करणारे नाहीत, असा विजय लिमये यांचा दावा आहे. दरम्यान लाकडापासून होणाऱ्या अंत्यसंस्काराला विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्याय नाही. विद्युत दाहिनी मध्ये अखेरीस कोळशापासून तयार होणाऱ्या विजेचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणीय हानी होतेच, असा विजय लिमये यांचा दावा आहे.
लाकडापासून होणारे अंत्यसंस्कार आणि त्याचे पर्यावरणीय समीकरण
- एक अंत्यसंस्कारासाठी 320 ते 350 kg लाकूड लागतो.
- त्यासाठी पंधरा वर्षे वयाचे दोन झाड तोडावे लागतात.
- भारतात दरवर्षी 80 लाख अंत्यसंस्कार लाकडापासून होतात.
- त्यामुळे एक कोटी साठ लाख झाडे फक्त अंत्यसंस्कारासाठी तोडावी लागतात.
- म्हणजेच अंत्यसंस्काराच्या नावाखाली दरवर्षी 100 वर्ग किलोमीटरचा जंगल आपण नष्ट करतो.
- त्या ऐवजी मोक्षकाष्ठ वापरले तर दरवर्षी एक कोटी साठ लाख झाड वाचतील.
- शिवाय देशात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर होईल.
- मोक्षकाष्ठ तयार करणे ग्रामीण भागातला एक उद्योग होऊ शकेल.
- मोक्षकाष्ठ निर्माण करण्याच्या कामात भारतात एक लाख नवे रोजगार निर्माण होऊ शकतात
इतर महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ-