एक्स्प्लोर
Satara Loksabha Bypoll | साताऱ्यात कॉलर नाही तर स्कॉलर वरचढ, उदयनराजे पिछाडीवर
पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबर साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात बसल्याचं चित्र आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंवर मोठी आघाडी घेतली आहे. श्रीनिवास पाटलांची आघाडी असली तर याचे खरे शिल्पकार शरद पवारच आहेत.
शरद पवारांची पावसात सभा
पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबर साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांची दृश्ये प्रेरणादायी ठरली. व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर केवळ पवारांच्या भर पावसातील भाषणाची चर्चा होती. या सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली.
साताऱ्यात कॉलर नाही तर स्कॉलर वरचढ
उदयनराजे भोसले यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच झाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले, त्यानंतर राज्यपाल पद भूषवलेले, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उदयनराजेंविरोधात उमेदवारी दिली. उदयनराजे त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना सिनेमाचे डायलॉग मारत कॉलर उडवताना पाहिलं आहे. त्यामुळे साताऱ्यात कॉलर नाही तर स्कॉलर वरचढ ठरत असल्याचं दिसत आहे.
श्रीनिवास पाटील दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील : पृथ्वीराज चव्हाण
श्रीनिवास पाटील उदयनराजेंविरोधात तब्बल दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement