एक्स्प्लोर
भाजपसह आठ पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई: वारंवार मागण्या करुनही कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं 8 राजकीय पक्षांना नोटीसा धाडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या पक्षांमध्ये सत्ताधारी भाजपचाही समावेश आहे. आयकर विवरण पत्र आणि लेखा परीक्षणाची प्रत सादर न केल्यामुळं निवडणूक आयोगानं भाजप, जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड, इंडियन युनियम मुस्लिम लीगसह 8 पक्षांना नोटीस पाठवली आहे. 9 सप्टेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे. दरम्यान, या पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षांना त्यांचं आरक्षित चिन्ह देखील गमवावं लागू शकतं.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















