एक्स्प्लोर
'एमआयएम'सह 191 राजकीय पक्षांची नोंदणी आयोगाकडून रद्द
मुंबई : नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्र आणि ऑडिट अहवालाची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असते. त्याचबरोबर सर्व उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे बाहुबळाचा वापर आणि आर्थिक बळाचा दुरुपयोग होऊ नये, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 359 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व 342 अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ही कागदपत्रं सादर न केल्यामुळे एकूण 326 राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मुदतीत संबंधित कागदपत्रं सादर न केल्यामुळे त्यापैकी 191 पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोंदणी रद्द करण्यात आलेले राजकीय पक्ष
मुंबई- 1) ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस, 2) सत्यशोधक समाज पक्ष, 3) शिवराज्य पक्ष, दादर, 4) जनादेश पार्टी, 5) नॅशनल लोक तांत्रिक पार्टी, 6) सार्वभौमिक लोक दल, 7) राष्ट्रवादी समाजवादी पार्टी, 8) महाराष्ट्र राजीव काँग्रेस, 9) एस. राष्ट्रीय जनहित पक्ष, 10) राष्ट्रीय सर्वसमाज पार्टी (इंडिया), 11) दलित मुस्लिम आदिवासी क्रांती संघ, 12) राष्ट्रीय महाशक्ती पार्टी, 13) इंडियन नॅशनॅलिस्ट पार्टी (एन), 14) जनकल्याण सेना, 15) आंबेडकरावादी जनमोर्चा, 16) होली ब्लेसिंग पीपल्स पार्टी, 17) लोकांचे दोस्त (Friends of People), 18) राष्ट्रीय लोकजागृती पार्टी, 19) वॉर व्हेटरन्स पार्टी, 20) राष्ट्रीय भीम सेना, 21) भीमशक्ती रिपब्लिकन सेना, 22) भारतीय आवाज पार्टी, 23) किसान गरीब नागरीक पार्टी, 24) इंन्डिपेंन्डन्ट् कॅन्डिडेट्स पार्टी, 25) राष्ट्रीय जन परिवर्तन पार्टी, 26) घरेलू कागमार सेना पक्ष, 27) भारतीय अपंग विकास पक्ष, 28) रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), फोर्ट. ठाणे/पालघर - 1) राष्ट्रवादी जनता पार्टी, 2) नेटीव्ह पीपल्स पार्टी, 3) भिवंडी विकास आघाडी (एकता मंच), 4) आगरी समाज विकास आघाडी, 5) मीरा- भाईंदर विकास मंच, 6) कल्याण- डोंबिवली महानगर विकास आघाडी, 7) उल्हास विकास आघाडी, 8) राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार जनक्रांती सेना (महाराष्ट्र राज्य), 9) बहुजन विकास सेना, 10) शाहू सेना, 11) नॅशनल बहुजन काँग्रेस, 12) लोकहितवादी पार्टी, 13) भारतीय बहुजन परिवर्तन सेना, 14) कोनार्क विकास आघाडी, 15) भारत विकास मंच. रायगड- 1) जनशक्ती आघाडी, पेण, 2) माथेरान विकास आघाडी, 3) अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती/इतर मागास वर्ग समाजाचा फक्त राखीव जागा गट, 4) कर्जत नागरी आघाडी. सिंधुदुर्ग- 1) अखिल भारतीय क्रांतिकारी व्यक्ती विकास पक्ष. नाशिक- 1) नाशिक शहर जिल्हा नागरी विकास आघाडी, 2) तिसरी आघाडी मालेगाव, 3) नाशिक शहर विकास आघाडी, 4) तिसरा महाज, मालेगाव, 5) मालेगाव विकास आघाडी, 6) नाशिक जिल्हा विकास आघाडी, 7) भारतीय भूमिपूत्र मुक्ती मोर्चा, 8) अधिकार सेना. जळगाव- 1) शहर बचाव आघाडी, भुसावळ, 2) खानदेश विकास आघाडी, जळगाव, 3) महानगर विकास आघाडी जळगांव, 4) सावदा विकास आघाडी, 5) नगर विकास आघाडी, फैजपूर, 6) अमळनेर तालुका शहर विकास आघाडी, 7) मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव, 8) भारतीय जनता विकास आघाडी, 9) फैजपूर परिसर विकास आघाडी, 10) एरंडोल शहर विकास आघाडी, 11) जामनेर शहर विकास आघाडी, 12) अखिल भारतीय बजरंग दल, 13) लोकसंघर्ष एकता विकास आघाडी, भुसावळ, 14) धरणगाव शहर प्रगती आघाडी, 15) जळगाव जिल्हा जनता आघाडी, 16) राष्ट्रीय अल्पसंख्याक महासंघ नंदुरबार- 1) जिल्हा विकास आघाडी, नंदूरबार, 2) जनकल्याण संघर्ष समिती, नवापूर. अहमदनगर- 1) इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, अहमदनगर, 2) नेवासा तालुका विकास आघाडी, नेवासा, 3) पारनेर तालुका विकास आघाडी, 4) राहाता तालुका विकास आघाडी, 5) कोपरगाव तालुका विकास आघाडी, 6) कर्जत तालुका विकास आघाडी, 7) जामखेड तालुका विकास आघाडी, 8) श्रीगोंदा तालुका विकास आघाडी, 9) राहूरी तालुका विकास आघाडी, 10) संगमनेर तालुका विकास आघाडी, 11) श्रीरामपूर तालुका विकास आघाडी, 12) पाथर्डी तालुका विकास आघाडी, 13) नगर तालुका विकास आघाडी, 14) शेवगांव तालुका विकास आघाडी, 15) अकोले तालुका विकास आघाडी, 16) जनसेवा विकास आघाडी, 17) लोकसेवा विकास आघाडी, 18) परिवर्तन समता परिषद, 19) लोकशक्ती विकास आघाडी, श्रीरामपूर, 20) जय तुळजा भवानी नवर्निमिती सेना. पुणे- 1) भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, 2) आळंदी शहर विकास आघाडी, 3) श्री संत ज्ञानेश्वर शहर विकास आघाडी, 4) लोकशाही विकास आघाडी, सासवड, 5) नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पार्टी, 6) तळेगाव शहर विकास समिती, 7) जुन्नर शहर परिवर्तन आघाडी, 8) पुणे जनहित आघाडी, 9) कॉमन मॅन पार्टी, 10) भारतीय नवजवान सेना (पक्ष), 11) दौंड तालुका जनसेवा विकास आघाडी, 12) भीमराज्य लोकसत्ता पार्टी, 13) महाराष्ट्र रिपब्लिकन महासंघ, 14) अखिल भारतीय जनसेवा पक्ष, (क्रांतिकारी) सोलापूर- 1) बार्शी परिवर्तन महाआघाडी, 2) पंढरपूर नागरीक सेवा आघाडी, 3) महाराष्ट्र परिवर्तन पार्टी, 4) नागरिक संघटना करमाळा, 5) देशभक्त नामदेवरावजी जगताप शहर विकास आघाडी, 6) राष्ट्रीय क्रांती दल, 7) लोकक्रांती पक्ष. सातारा- 1) म्हसवड सिध्दनाथ पॅनेल, 2) फलटण शहर नागरी संघटना, 3) जनकल्याण आघाडी, 4) जनता परिवर्तन पॅनल, 5) खटाव माण विकास आघाडी, 6) नागोबा आघाडी म्हसवड, 7) जावली विकास आघाडी, 8) यशवंत विकास आघाडी, मलकापूर, 9) लोकशक्ती विकास आघाडी, 10) जरंडेश्वर विकास आघाडी, 11) महाराष्ट्र क्रांतिसेना. सांगली- 1) विकास महाआघाडी, 2) नागरिक संघटना, उरण-इस्लामपूर, 3) आष्टा शहर नागरिक संघटना, आष्टा, 4) लोकशाही आघाडी तासगांव, 5) विशाल काँग्रेस, 6) विकास आघाडी जत तालुका, 7) स्वाभिमानी विकास आघाडी, सांगली, 8) वसंतदादा विकास आघाडी. कोल्हापूर- 1) जनसेवा पार्टी (महाराष्ट्र), 2) शहर विकास आघाडी, कोल्हापूर जिल्हा, 3) जनविकास आघाडी, कुरुंदवाड, 4) मलकापूर शहर महाविकास आघाडी, 5) जयसिंगपूर शहर विकास आघाडी, 6) श्री छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडी, मुरगूड, 7) सिध्देश्वर शहर विकास आघाडी. औरंगाबाद- 1) सिल्लोड शहर परिवर्तन विकास आघाडी, 2) लोकशाही विचार मंच, 3) सिल्लोड शहर विकास आघाडी, 4) बहुजनवादी काँग्रेस पार्टी, 5) महाराष्ट्र जनसंग्राम पार्टी, 6) शहर प्रगती आघाडी, 7) स्वाभिमानी सेना. बीड- 1) प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी, 2) अंबाजोगाई विकास आघाडी, 3) बीड विकास आघाडी. नांदेड- 1) संविधान पार्टी, 2) बिलोली शहर विकास आघाडी, 3) महाराष्ट्र पीपल्स पार्टी. जालना- 1) भीमसेना पँथर्स पार्टी (महाराष्ट्र). लातूर- 1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), लातूर, 2) भारतीय ज्वालाशक्ती पक्ष. अमरावती- 1) विदर्भ जनसंग्राम, 2) वरुड विकास आघाडी. अकोला- 1) अकोला महानगर विकास मंच, 2) आझाद हिंद काँग्रेस पार्टी. यवतमाळ- 1) सन्मान, 2) जनसेवा आघाडी, 3) विदर्भ जन आंदोलन आघाडी. बुलडाणा- 1) नगर विकास आघाडी, नांदुरा, 2) मलकापूर विकास आघाडी, 3) चिखली शहर विकास आघाडी, 4) बहुजन विकास महासंघ, 5) बहुजन समान पक्ष. नागपूर- 1) महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, नागपूर, 2) डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी, 3) ग्रीन पार्टी ऑफ इंडिया, 4) भारतीय संताजी पार्टी, 5) जनसेवा आघाडी, मोवाड, 6) नॅशनल संगमयुग पार्टी, 7) जनलोकपाल आघाडी, 8) युथ फोर्स, 9) नगर विकास आघाडी, नरखेड, 10) समाज सुधार गण परिषद, 11) लोकसेवा समिती, मोवाड, 12) भारतीय परिवर्तन कॉग्रेस. वर्धा- 1) आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, 2) स्वतंत्र विकास आघाडी. गोंदिया- 1) मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, गोंदिया, 2) नगर विकास समिती. उत्तरप्रदेश- 1) पीस पार्टी. छत्तीसगड- 1) गोंडवाना गणतंत्र पार्टी, 2) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे). हैदराबाद- 1) लोकसत्ता पार्टी, 2) ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन. लखनौ- 1) सोशालिस्ट पार्टी (इंडिया).अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement