Exclusive : विनायक राऊतांनी उमेदवारी देताना पैसे उकळले, बंडखोर खासदारांचा राऊतांवर हल्लाबोल
विनायक राऊतांनी उमेदवारी देत असताना पैसे घेतले होते. या संदर्भात माझ्याकडे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट खासदार हेमंत पाटील 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी एबीपी माझाशी संवाद साधला. बहुसंख्य खासदारांनी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना व्हिलन ठरवलं. मातोश्रीने अन्याय केला. विनायक राऊतांनी पदासाठी पैसे घेतले, मातोश्री,वर्षाच्या बाहेर तासन् तास वाट पाहायला लावली, असा गौप्यस्फोट एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. विनायक राऊतांनी वाढदिवसाचा खर्च घेतला. सोन्याच्या चेन घेतल्या, आता त्यांना आमचा व्हिप ऐकावा लागेल, असं शिंदे गटाचे खासदार म्हणाले.
खासदार हेमंत पाटील म्हणाले, विनायक राऊतांनी उमेदवारी देत असताना पैसे घेतले होते. या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहे. त्यांच्या तक्रारी आम्ही उद्धव ठाकरेंकडे केल्या आहेत. विनायक राऊतांनी वाढदिवसाचा खर्च घेतला. सोन्याच्या चेन घेतल्या, पैसे घेतले.
शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या आसपास असणाऱ्या चौकटीमुळे फुटली आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमच्या व्यथा, आमच्या समस्या सुटल्या नाहीत. मातोश्रीने अन्याय केला. अडीच वर्षे आम्हाला निधी दिलेला नाही. मातोश्री,वर्षाच्या बाहेर तासन् तास वाट पाहायला लावली. तीन वर्षे आम्ही संघर्ष केला, एक रुपयाचा निधी मिळालेला नाही, असाही आरोप खासदारांनी केला आहे.
शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे नेत अरविंद सावंत यांनी जे आरोप केले ते शिंदे गटांच्या खासदारांनी फेटाळले आहेत. राहुल शेवाळे जे म्हणाले तेच खरे आहे, असे भावना गवळी म्हणाल्या. विनायक राऊतांच्या कार्यपद्धतीवर सर्व खासदारांचा आक्षेप होता. आम्ही येथे गटनेता बदलला आहे. आता त्यांना आमचा व्हिप ऐकावा लागणार आहे. आम्ही त्यांना अडीच वर्षे साथ दिली आता ते पुढील दोन वर्षे आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे. सर्वानुमते हा निर्णय खासदारांनी घेतला आहे, असेही खासदार म्हणाले.
संबंधित बातम्या :
नितीन गडकरींनी सांगितलं होतं, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देता येणार नाही; शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर
मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट