मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरु, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना टोला
गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन बंधूमध्ये जवळीक वाढत आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.
Eknath Shinde : गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन बंधूमध्ये जवळीक वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार महिन्यात ठाकरे बंधू सात वेळा एकत्र आले आहेत. त्यामुळं आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच मुद्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टोला लगावला आहे. मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरु असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्याने एकत्र येत आहेत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्याने एकत्र येत आहेत. शिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुका दोघे एकत्र लढण्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. मात्र यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. पूर्वी भाऊ बंधकी नाटक गाजलं होतं, मात्र आता मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला राज आणि उद्धव ठाकरेंना लगावला.
निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते, आता पराभव दिसू लागल्यामुळं निवडणुका पुढे ढकला म्हणतात
निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते आता त्यांना पराभव दिसू लागला त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असे म्हणत असल्याचा टोला त्यांनी लावला आहे. अशोक मामाचं एक नाटक होत सारख छातीत दुखतंय मामांना मी सांगू इच्छितो शिवसेनेचे यश पाहून काही लोकांच्या छातीत सारख दुखतंय. अंबरनाथ मध्ये धर्मावर आनंद दिघे नाट्यगृहाचे लोकार्पण एकनाथ शिंदे, अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.
शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्करवर दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दिपोत्सवानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिपोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले होते . यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:


















