'कम ऑन किल मी' म्हणणाऱ्यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडलाय, मेलेल्यांना कोण मारणार? एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Shiv Sena 59th Foundation Day : हिंदुत्व सोडणाऱ्यांना महाराष्ट्राने विधानसभेत त्यांची जागा दाखवली. आज बाळासाहेब असते तर त्यांना उलटे टांगून मिरचीचा धूर दिला असता.

मुंबई : आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 'कम ऑन किल मी' असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडला आहे, मेलेल्यांना काय मारणार असा टोलाही शिंदे यांनी लगावला. ते शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Shiv Sena 59th Foundation Day : आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर ते सत्तेसाठी लाचार
आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपलं. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : यांनी हिंदुत्व, मराठी माणसाशी विश्वासघात केला
बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता.
Eknath Shinde Speech : तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला
आता यांना मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. बदलापूरच्या बाहेर गेला.
Shiv Sena Foundation Day : हिंदुत्व सोडणाऱ्यांना महाराष्ट्राने जागा दाखवली
हिंदुत्व हा काय टी शर्ट आहे का? तुम्ही म्हणता हिंदुत्व सोडलं नाही, मग बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणताना जीभ का जड होते? हिंदूंना शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी का लाऊन बसता? हिंदुत्व धरसोड करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवली. ज्या 20 जागा आल्या त्या काँग्रेसच्या मेहेरबानीमुळे आल्या.
Eknath Shinde On Marathi : मराठी आमचा श्वास आहे
हिंदुत्व हा आत्मा आहे आणि मराठी आमचा श्वास आहे. राजकारणासाठी मराठीला कधीही अंतर देणार नाही हा माझा शब्द आहे.
Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : 'कम ऑन किल मी' म्हणणाऱ्यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडलाय
'कम ऑन किल मी' असं उद्धव ठाकरे म्हणाले. अरे मेलेल्यांना कोण मारणार? महाराष्ट्राच्या जनतेने यांचा मुडदा आधीच पाडला आहे. पण नुसताच शोर करून मनगटात जोर येत नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडग्याला वाघ होता येत नाही. नुसता तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही, मनगटात दम असावा लागतो. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलंय.
Eknath Shinde On BMC Election : यांचा जीव BMC च्या तिजोरीत
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या मुंबईचा लढा कॅम्पेन सुरू केलं आहे. हा लढा आता आठवला, सत्तेत असताना काय केलं? लढायला घराबाहेर तर पडायला हवं. घरात बसून काही होत नाही. आता जे काही घरातून बाहेर पडत आहात त्या मागे एकनाथ शिंदे आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही.
'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' मोहीम सुरू
यापुढे राज्यात सूनांचा छळ होणार नाही. त्यांच्या रक्षणासाठी शिवसेनेने 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' ही मोहीम सुरू केली आहे. ज्या ठिकाणी सूनांचा छळ होईल त्या ठिकाणी आमच्या रणरागिणी धावून जातील. शिवसेनेच्या शाखा लाडक्या सूनांसाठी हक्काचं ठिकाण असेल.
ही बातमी वाचा:



















